मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Shraddha Murder Case : हत्या करण्याआधी पाहिला दृश्यम, दुसऱ्या पार्टची प्रतिक्षा, 'पॉलीग्राफी'मध्येही आफताब करतोय दिशाभूल

Shraddha Murder Case : हत्या करण्याआधी पाहिला दृश्यम, दुसऱ्या पार्टची प्रतिक्षा, 'पॉलीग्राफी'मध्येही आफताब करतोय दिशाभूल

श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालाची शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही पोलिसांचा तपास सुरू आहे.

श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालाची शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही पोलिसांचा तपास सुरू आहे.

श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालाची शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही पोलिसांचा तपास सुरू आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 25 नोव्हेंबर : श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालाची शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही पोलिसांचा तपास सुरू आहे. दरम्यान आफताबची पॉलीग्राफ चाचणी घेण्याचा निर्णयाला एफएसएलच्या संचालक दीपा वर्मा यांनी दुजोरा दिला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चाचणीतून अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे. दरम्यान आफताबने कबूल केले आहे की, श्रद्धाच्या हत्येपूर्वी त्याने 'दृश्यम' हा बॉलिवूड चित्रपट पाहिला होता, तो पार्ट-2 चीही वाट पाहत होता.

तो हत्येनंतरचे चित्रपटातील काही दृष्ये पाहूनच कथा रचण्याचा प्रयत्न करत होता. आफताबने प्लॅनिंग करून खून केला आणि नंतर श्रद्धाचे मित्र आणि कुटुंबीयांशी बोलून तो पुरावे तयार करायचा. यातून तो निर्दोष मुक्त होऊ शकेल असाच त्याचा डाव होता. या प्लॅनमुळे आफताब सतत श्रद्धाच्या मित्रांशी फोन आणि सोशल मीडियावर बोलत होता. श्रद्धा मला सोडून गेल्याचे वारंवार तो त्यांच्या मनात बिंबवत होता.

हे ही वाचा : पतीच्या त्रासामुळे ठेवले पोलीस कॉन्स्टेबलशी संबंध, पुढे महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार

पॉलीग्राफ चाचणीत दिशाभूल करण्याचा प्रयत्न

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉलीग्राफ चाचणीच्या पहिल्या दिवशी आफताबने एफएसएल तज्ज्ञासमोर दृश्यम या चित्रपटाचा उल्लेख केला. तज्ज्ञांनी आफताबला विचारले की, चित्रपट पाहून तू वाचू शकशील असे तुला वाटते का? यावर आफताब निरुत्तर झाल्याचे दिसून आले. आफताबला पुन्हा विचारण्यात आले की दृष्यम चित्रपट पाहिल्यानंतर तुला हत्या करण्याचे सूचले होते का? यावर आफताब म्हणाला की हो, मी दृष्यम आता दृष्टीम पार्ट 2 देखील पाहून पुढचा प्लॅन आखणार होते असे सांगितलं.

आफताबला श्रद्धाचा खूप तिरस्कार यायचा

आफताबच्या पॉलिग्राफ चाचणीत सहभागी मानसशास्त्रज्ञांना मते, आफताबला श्रद्धाचा तिरस्कार होता. श्रद्धाला प्रवासाची खूप आवड होती आणि याच बहाण्याने तो तिला उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये घेऊन गेला. श्रद्धाला फिरायला नेण्यामागेही खुनाचे नियोजन होते. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक कसे घडले हे त्याला दाखवून द्यायचे होते. त्या पद्धतीने तो तसे पुरावेही तयार करत होता.

आफताबने श्रद्धाला रागातून नाही तर नियोजन करून मारले असे मानसशास्त्रज्ञांच्या टीमचे म्हणणे आहे. आफताबने श्रद्धाला मुंबईहून दिल्लीत आणले. अशी त्याने चौकशीदरम्यान कबुली दिली. श्रध्दाच्या आई-वडिलांसोबतही त्याचे अनेकदा भांडण झाले होते.

हे ही वाचा : आणखी एक 'श्रद्धा'! विवाहित मुस्लीम तरुणाने युवतीला फसवलं, बोलणं बंद करताच भयानक कांड

आफताबने कोर्टात सर्व काही हीट ऑफ द मोमेंटमध्ये घडल्याचे सांगितले असले तरी तो ज्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरे देत आहे, त्यावरून त्याने शांत डोके ठेवून त्याने ही हत्या केल्याचे दिसून येत आहे. आफताबचे वकील अबिनाश कुमार यांनी दावा केला आहे की, आफताबने रागाच्या भरात हत्येबाबत न्यायालयात कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे सांगितलं.

First published:

Tags: Delhi Police, Mumbai, Murder Mystery, Murder news