मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे 10 प्रहार, मुख्य निशाणा कोणावर?

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे 10 प्रहार, मुख्य निशाणा कोणावर?

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्यानिमित्त केलेल्या भाषणात यावेळी अनेक मुद्द्यांना हात घातला.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्यानिमित्त केलेल्या भाषणात यावेळी अनेक मुद्द्यांना हात घातला.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्यानिमित्त केलेल्या भाषणात यावेळी अनेक मुद्द्यांना हात घातला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 5 ऑक्टोबर : दसरा मेळाव्यातल्या सभेमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवरही निशाणा साधला आहे. "ज्यावेळेला शिवसेनेत गद्दारी केली. होय गद्दारच म्हणणार. मंत्रीपदं तुमच्या बुडाला चिपकलेली असली तरी ती काही काळापुरती आहेत. पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसून पुस्ता येणार नाही", अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर बाण मारला.

1. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधत तुमच्यावरील गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसणार नाही अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.

2. आम्ही काँग्रेससोबत गेलो, म्हणून हिंदुत्व सोडलं म्हणता. मग पाच वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो. त्यात कसं जाऊन अशोक चव्हाणांना जाऊन भेटले होते, हा त्यांनी गौप्यस्फोट केला आहेच. पण आम्ही सोबत असतानाही औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव केलं नाही. पण ते काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत असताना मी करून दाखवलं आहे.

3. बिल्किस बानो गुजरात दंगलीमध्ये गर्भवती होती. तिच्यावर बलात्कार झाला. तिच्या डोळ्यांसमोर तिच्या चिमुकलीचा खून करण्यात आला. आरोपी शिक्षा भोगत होते. गुजरात सरकारने त्यांना सोडून दिलं. एवढंच नाही, गावी गेल्यावर त्यांचा स्वागत सत्कार केला. या गोष्टी तुमच्या पक्षात घडत असतील, तर इतर लोक महिलाशक्तीचा काय आदर राखणार?

4. आज मोहन भागवत म्हणाले स्त्रीशक्ती आणि पुरुष यांच्यात समानता असायला हवी. पण त्यांना मला विचारायचंय, महिला शक्तीचा आदर ठेवताना उत्तराखंडमध्ये पवनी नावाच्या जिल्ह्यात अंकिता भंडारी नावाच्या 19 वर्षांच्या मुलीचा खून झाला. तिथे एका रिसॉर्टच्या बाजूला तिचा मृतदेह आढळला. ते रिसॉर्ट भाजपाच्या स्थानिक नेत्याचं आहे. हा महिलाशक्तीचा आदर.. तो हॉटेलमालक त्या अंकिताला येणाऱ्या-जाणाऱ्यांसोबत काही करण्यास सांगत होता. तिने नकार दिला. झाला तिचा खून. कुठे आहे महिला शक्तीचा आदर?

5. अमित शाहांसोबत ठरलं होतं. पण त्यांनी नकार दिला. मी शिवरायांच्या साक्षीने माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगतो. जे मी बोललो तसंच घडलं होतं. भाजप-सेनेचा अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा काळ वाटून घ्यायचा हे ठरलं होतं.

6. उद्धव ठाकरे म्हणाले, आनंद दिघे एकनिष्ठ शिवसैनिक होते. त्यांना जाऊन 20 वर्षे झालीत. आज त्यांची आठवण आली. ते एकनिष्ठ होते. जाताना ते भगव्यातून गेली. ही सर्व माणसं बघितल्यावर बोलण्याची पंचाईत होते.

7. देवेंद्र फडणवीस यांना कायदा चांगला कळतो. हा काही टोमणा मारला नाही. सभ्यगृहस्थ आहेत. हा टोमणा नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. जाताना म्हणाले होते, पुन्हा येईन पुन्हा येईन. दीड दिवसासाठी आले. दीड दिवसात विसर्जन झाले.

वाचा - Dasara Melava : 'तुम्ही राष्ट्रवादीकडे पक्ष गहाण टाकला', एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर चौफेर टीका

8. ही ठाकरे कुटुंबीयांची कमाई आहे. या मेळाव्यानंतर रावण दहन होणार आहे. यावेळचा रावण वेगळा आहे. काळ बदलतो तसा रावण बदलतो. आतापर्यंत दहा तोंडाचा होता. आता किती झाला. डोक्यांचा नाही खोक्यांचा. पन्नास खोक्यांचा हा खोकासूर आहे, धोकासूर आहे, अशा शब्दात उद्धव यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला आहे.

9. माझं आव्हान आहे. एकच व्यासपीठ. तुम्ही भाजपाची स्क्रिप्ट न घेता भाषण करून दाखवायचं. मी मुख्यमंत्री असताना 4-5 पत्रकार परिषदा झाल्या. माझ्या बाजूला अजित पवार बसायचे. कधीच त्यांनी माझ्यासमोरचा माईक खेचला नव्हता.

10. रावणाने संन्याशाचं रुप घेऊन सीतेचं हरण केलं होतं, तसं हे तोतये बाळासाहेबांचा चेहरा लावून शिवसेना हडपायला आले आहेत. शिवाजी पार्क मिळू नये म्हणून हे मागे लागले. कोर्टात निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात जर मी लक्ष घातलं असतं, तर यांना हे मैदान मिळालं नसतं. काय बापाची पेंड आहे तुमच्या? गद्दार तर आहेतच. आता धनुष्यबाण हवं, बाळासाहेब हवेत, शिवाजी पार्क हवं.. घेऊन जाणार कुठे?

First published:

Tags: Shiv sena, Shiv sena dasara melava, Uddhav tahckeray