मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : सहार गाव, नवपाडा परिसर वार्डात मागच्या वेळी शिवसेनेचा विजय, आता पक्षातच दोन गट, काय असणार सत्ता समीकरणं?

BMC Election 2022 : सहार गाव, नवपाडा परिसर वार्डात मागच्या वेळी शिवसेनेचा विजय, आता पक्षातच दोन गट, काय असणार सत्ता समीकरणं?

मुंबईतील वार्ड क्रमांक 89मध्ये छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, सहार गाव, मरोळ, नवपाडा परिसर या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 9 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 89मध्ये (Ward no. 89) मागच्या निवडणुकीत शिवसेनेचे (Bjp) वर्चस्व दिसले होते. शिवसेनेचे दिनेश कुबल याठिकाणी विजयी झाले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 89बाबत. मुंबईतील वार्ड क्रमांक 89मध्ये छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, सहार गाव, मरोळ, नवपाडा परिसर या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो. वार्ड क्रमांक 89मध्ये शिवसेनेचे दिनेश कुबल हे विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेस उमेदवार सूर्यवंश ठाकूर, भाजप उमेदवार दिलीप पाटील आणि मनसेच्या संतोष उप्रळकर यांचा पराभव केला होता. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वार्ड क्रमांक 89चा विचार केला तर येथील जनता पुन्हा शिवसेनेला संधी देते की, अन्य दुसऱ्या पक्षाला, हे आगामी निवडणुकीत पाहणे महत्त्वाचे आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या