मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : जिजामाता रोड वार्डात 2017ला शिवसेनेची बाजी, यावेळी पक्षात दोन गट... काय असणार सत्तेचं समीकरण?

BMC Election 2022 : जिजामाता रोड वार्डात 2017ला शिवसेनेची बाजी, यावेळी पक्षात दोन गट... काय असणार सत्तेचं समीकरण?

वार्ड क्रमांक 79 हा मुंबईतील एक महत्त्वाचा भाग आहे. या वार्डात गुलमोहर रोड, जिजामाता रोड, महाकाली रोड, मालपा डोंगरी रोड, दत्त जगदंबा मंदिर रोड, महाकाली रोड, एमएचबी रोड यासह इतर महत्त्वाचे विभाग येतात.

    मुंबई, 8 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. वार्ड क्रमांक 79बाबत (Ward no. 79) बोलायचे झाले तर याठिकाणी शिवसेनेचे (Shivsena) वर्चस्व दिसून आले होते. याठिकाणी शिवसेना उमेदवार सदानंद वामन परब हे निवडून आले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 79 बाबत. वार्ड क्रमांक 79 हा मुंबईतील एक महत्त्वाचा भाग आहे. या वार्डात गुलमोहर रोड, जिजामाता रोड, महाकाली रोड, मालपा डोंगरी रोड, दत्त जगदंबा मंदिर रोड, एमएचबी रोड यासह इतर महत्त्वाचे विभाग येतात. 2017मध्ये याठिकाणी शिवसेनेने बाजी मारली होती. शिवसेना उमेदवार सदानंद वामन परब हे निवडून आले होते. त्यांना 9659 मते मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजप आणि अपक्ष उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता. 2017च्या निवडणुकीत एकूण 39427 मतदार होते. त्यापैकी 23515 वैध मतदान झाले होते. त्यापैकी तब्बल 9659 इतके मतदान शिवसेनेला झाले होते. शिवसेनेचे सदानंद वामन परब यांनी याठिकाणी बाजी मारली होती. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते - 
    1. सदानंद वामन परब, शिवसेना - 9659
    2. संतोष गंगाराम मेढेकर, भाजप - 5002
    3. अजय शिवपूजन तिवारी, अपक्ष - 4157
    4. पुरुषोत्तम बाबुराव जळगावकर, काँग्रेस - 2046
    5. मोनिका काजमीर फर्नांडिस, मनसे - 1675
    6. संदीप दत्ताराम पवार, अपक्ष - 162
    7. राजेश बुद्धू यादव, सपा - 493
    हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर - 2017च्या निवडणुकीत याठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले होते. दरम्यान, नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या