मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : संकल्प कॉलनी, बंजारापाडा वार्डात जनतेचा मागच्या वेळी शिवसेनेला कौल, यावेळी समीकरणं बदलणार का?

BMC Election 2022 : संकल्प कॉलनी, बंजारापाडा वार्डात जनतेचा मागच्या वेळी शिवसेनेला कौल, यावेळी समीकरणं बदलणार का?

वार्ड क्रमांक 73मध्ये संकल्प कॉलनी, नागरी निवारा मीरा नगर, बंजारापाडा, दिंडोशी कोर्ट आदी भागांचा समावेश आहे. हा वार्ड सर्वांसाठी खुला आहे.

वार्ड क्रमांक 73मध्ये संकल्प कॉलनी, नागरी निवारा मीरा नगर, बंजारापाडा, दिंडोशी कोर्ट आदी भागांचा समावेश आहे. हा वार्ड सर्वांसाठी खुला आहे.

वार्ड क्रमांक 73मध्ये संकल्प कॉलनी, नागरी निवारा मीरा नगर, बंजारापाडा, दिंडोशी कोर्ट आदी भागांचा समावेश आहे. हा वार्ड सर्वांसाठी खुला आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 10 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 73 चा (Ward no. 73) विचार केला तर याठिकाणी शिवसेनेने बाजी मारली होती. शिवसेना उमदेवार प्रविण गजानन शिंदे (Shivsena Candidate Gajanan Shinde) हे याठिकाणी निवडून आले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 73 बाबत. वार्ड क्रमांक 73मध्ये संकल्प कॉलनी, नागरी निवारा मीरा नगर, बंजारापाडा, दिंडोशी कोर्ट आदी भागांचा समावेश आहे. हा वार्ड सर्वांसाठी खुला आहे. मागच्या वेळी याठिकाणी सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यात शिवसेनेने बाजी मारली. शिवसेना उमदेवार प्रविण गजानन शिंदे हे याठिकाणी निवडून आले होते. त्यांना या निवडणुकीत 13084 इतकी मते मिळाली होती. तसेच इतरांचा विचार केला तर दुसऱ्या क्रमांकावर भाजप हा पक्ष होता. मात्र, मतांची आकडेवारी पाहिली तर मोठ्या फरकाने इथे शिवसेना उमेदवार विजयी झाला होता. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते पुढीलप्रमाणे - प्रविण गजानन शिंदे, शिवसेना - 13084 भालचंद्र गंगाराम अंबुरे, भाजप - 5579 सुनिल निवृत्ती खरात, बहुजन समाज पार्टी - 52 कोरी आकाश हरिकेष, अपक्ष - 46 संजय अनंत महाले, काँग्रेस - 207 प्रमोद विष्णू म्हसकर, मनसे - 1936 नितिन सावंत, काँग्रेस - 3209 नोटा - 469
  • एकूण वैध मते - 24582
हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका
राज्यात सत्तांतर - 
नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वार्ड क्रमांक 73 चा विचार केला तर येथील जनता पुन्हा शिवसेनेला संधी देते की, अन्य दुसऱ्या पक्षाला, हे आगामी निवडणुकीत पाहणे महत्त्वाचे आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या