मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : 2017 ला विजयी झालेल्या शीतल म्हात्रेंची शिवसेनेतून हकालपट्टी, यावेळी कांदर पाडा वार्डात काय होणार?

BMC Election 2022 : 2017 ला विजयी झालेल्या शीतल म्हात्रेंची शिवसेनेतून हकालपट्टी, यावेळी कांदर पाडा वार्डात काय होणार?

वार्ड क्रमांक 7 मध्ये शिवसेनेची सत्ता आहे. येथील नगरसेविका शीतल म्हात्रे या मागील दोन वेळेपासून सतत याठिकाणी निवडून आल्या आहेत.

वार्ड क्रमांक 7 मध्ये शिवसेनेची सत्ता आहे. येथील नगरसेविका शीतल म्हात्रे या मागील दोन वेळेपासून सतत याठिकाणी निवडून आल्या आहेत.

वार्ड क्रमांक 7 मध्ये शिवसेनेची सत्ता आहे. येथील नगरसेविका शीतल म्हात्रे या मागील दोन वेळेपासून सतत याठिकाणी निवडून आल्या आहेत.

  मुंबई, 9 ऑगस्ट : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका समजल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात लवकरच होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 7 कांदर पाडाबाबत (Ward no. 7 Kandar Pada) विचार केला तर याठिकाणी शिवसेनेचे (Shivsena) वर्चस्व दिसून येते. 2017च्या मनपा निवडणुकीत शिवसेना उमदेवार शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre Shivsena) याठिकाणी निवडून आल्या होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 7 बाबत. वार्ड क्रमांक 7 मध्ये शिवसेनेची सत्ता आहे. येथील नगरसेविका शीतल म्हात्रे या मागील दोन वेळेपासून सतत याठिकाणी निवडून आल्या आहेत. 2017च्या निवडणुकीत त्यांना 8205 मते मिळाली होती. निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी पाहिली तर या भाजपने मात्र त्यांना चांगलीच टक्कर दिली होती. भाजप उमेदवार योगिता पाटील यांनी त्यांना चांगलीच लढत दिली होती. त्यामुळे शीतल म्हात्रे यांचा फक्त 520 मतांनी विजय झाला होता. भाजप आणि शिवसेना या प्रमुख दोन विरोधी पक्षांमध्ये याठिकाणी काट्याची लढत पाहायला मिळाली होती. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते पुढीलप्रमाणे -
  1. शीतल म्हात्रे, शिवसेना - 8205
  2. योगिता पाटील, भाजप - 7685
  3. पूजा भोईर, मनसे - 2068
  4. बॉबी वर्गिस, काँग्रेस - 1965
  5. रमा चव्हाण, बसपा - 314
  6. तृप्ती येरूणकर, राष्ट्रवादी - 271
  7. नोटा - 494
  वॉर्ड क्रमांक 7 मध्ये दहिसर नदी, श्री दिगंबर जैन मंदिर, नवा गाव, कांदर पाडा, सुधीर फडके उड्डाणपूल, रामकुवर ठाकूर मार्ग, एस. व्ही. रोड, मराठा कॉलनी, सुकरवाडी, दौलत नगर या भागांचा समावेश होतो. या वार्डाची लोकसंख्या ही 49731 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची 2647 तर अनुसूचित जमातीचे 453 नागरिक आहे. या वॉर्डात 34873 मतदार आहेत. त्यापैकी 20942 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर 13931 मतदारांनी मतदान केले नाही. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका दरम्यान, नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिंदेगटाला पाठिंबा दिल्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे या वार्डात नेमके काय होते, ते पाहणे महत्त्वाचे आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: BMC, Election, Mumbai

  पुढील बातम्या