मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : जोगेश्वरी वार्डात शिवसेनेचे वर्चस्व; मात्र यावेळी पक्षात दोन गट, काय असणार सत्ता समीकरण?

BMC Election 2022 : जोगेश्वरी वार्डात शिवसेनेचे वर्चस्व; मात्र यावेळी पक्षात दोन गट, काय असणार सत्ता समीकरण?

शाहीदा खान यांनी 2017मध्ये शिवसेनेच्या वतीने वार्ड क्रमांक 64 जोगेश्वरीतून निवडणूक लढवली होती.

शाहीदा खान यांनी 2017मध्ये शिवसेनेच्या वतीने वार्ड क्रमांक 64 जोगेश्वरीतून निवडणूक लढवली होती.

शाहीदा खान यांनी 2017मध्ये शिवसेनेच्या वतीने वार्ड क्रमांक 64 जोगेश्वरीतून निवडणूक लढवली होती.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 10 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 64बाबत. मुंबईतील वार्ड क्रमांक 64मध्ये (Ward no. 64) मागच्या वेळी शिवसेनेचे (Shivsena) वर्चस्व दिसून आले होते. शिवसेनेच्या उमेदवार शाहीदा खान या याठिकाणी निवडून आल्या होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 64 बाबत. पती शाखाप्रमुख, पत्नी नगरसेविका - शाहीदा खान यांनी 2017मध्ये शिवसेनेच्या वतीने वार्ड क्रमांक 64 जोगेश्वरीतून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या. शाहीदा खान या गृहिणी आहेत. शाहीदा खान यांनी कोरोनाकाळात बरेच काम केले होते. त्याचे कौतुकही झाले होते. त्यांचे पती हे मागील 25 वर्षांपासून शिवसेनेत आहेत. त्यांच्या पतीने नाव हारुन खान असे आहे. हारुन खान हे मागील 15 वर्षांपासून आंबोलीत शाखाप्रमुख आहेत. वार्ड क्रमांक 64मध्ये मुस्लिम लोकसंख्या फक्त 35 टक्के आहे. मागच्या निवडणुकीत एमआयएम आणि शिवसेना या दोन पक्षांव्यतिरिक्त याठिकाणी प्रत्येक पक्षाने हिंदू उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यात शिवसेनेच्या शाहीदा खान यांनी बाजी मारली. हेही वाचा - BMC Election 2022 : लोखंडवाला कॉम्पलेक्स वार्डामध्ये भाजप पुन्हा बाजी बारणार का, यावेळच्या निवडणुकीत काय होणार? राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा परिस्थितीत वार्ड क्रमांक 207ची जनता आगामी काळात पुन्हा भाजपला साथ देते की अन्य दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराच्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ घालतात, हे आगामी काळात निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
First published:

पुढील बातम्या