Home /News /maharashtra /

BMC Election 2022 : आंबेवाडी, मराठा कॉलनी वार्डात 2017ला शिवसेनेची बाजी, यावेळी काय होणार?

BMC Election 2022 : आंबेवाडी, मराठा कॉलनी वार्डात 2017ला शिवसेनेची बाजी, यावेळी काय होणार?

वार्ड क्रमांक 6मध्ये अतन नगर, आंबेवाडी, ओवरी पाडा, मराठा कॉलनी, मानव कल्याण केंद्र या भागांचा समावेश आहे.

    मुंबई, 6 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान, या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे.  वार्ड क्रमांक 6मध्ये (Ward no. 6) मागच्या निवडणुकीत शिवसेनेचे (Shivsena) वर्चस्व दिसले होते. शिवसेना उमेदवार हर्षद प्रकाश कारकर याठिकाणी निवडून आले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 6बाबत. वार्ड क्रमांक 6मध्ये अतन नगर, आंबेवाडी, ओवरी पाडा, मराठा कॉलनी, मानव कल्याण केंद्र या भागांचा समावेश आहे. हा वार्ड सर्वांसाठी खुला आहे. मागच्या वेळी या वार्डात शिवसेनेने बाजी मारली होती. 2017च्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 6मध्ये हर्षद प्रकाश कारकर हे विजयी झाले होते. त्यांना या निवडणुकीत 11355 इतकी मते मिळाली होती. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते पुढीलप्रमाणे -
    1. हर्षद प्रकाश कारकर, शिवसेना - 11355
    2. नीला कनूभाई राठोड, भाजप - 9647
    3. सुभाष बळीराम नाहेरे, काँग्रेस - 1801
    4. वसंत सहदेव धोंडगे, मनसे - 530
    5. नोटा - 429
    मागच्या निवडणुकीत 39173 इतके एकूण मतदार होते. त्यापैकी 23762 इतकी मते वैध ठरली होती. वार्ड क्रमांक 6मध्ये झालेल्या या पंचरंगी निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी, असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे राज्यात झालेल्या सत्तांतराचा या निवडणुकीवर काय परिणाम होतो तसेच वार्ड क्रमांक 8चा विचार केला तर येथील जनता पुन्हा शिवसेनेला संधी देते की, अन्य दुसऱ्या पक्षाला, हे आगामी निवडणुकीत पाहणे महत्त्वाचे आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या