मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : अशोकवन, चिंतामणी नगर वार्डात मागच्या वेळी शिवसेनेची बाजी, यावेळी समीकरणं बदलली...

BMC Election 2022 : अशोकवन, चिंतामणी नगर वार्डात मागच्या वेळी शिवसेनेची बाजी, यावेळी समीकरणं बदलली...

वार्ड क्रमांक 5 हा महिलांसाठी आरक्षित आहे. 2017च्या निवडणुकीत या वार्डात शिवसेनेची (Shivsena) जादू चालताना दिसली होती.

वार्ड क्रमांक 5 हा महिलांसाठी आरक्षित आहे. 2017च्या निवडणुकीत या वार्डात शिवसेनेची (Shivsena) जादू चालताना दिसली होती.

वार्ड क्रमांक 5 हा महिलांसाठी आरक्षित आहे. 2017च्या निवडणुकीत या वार्डात शिवसेनेची (Shivsena) जादू चालताना दिसली होती.

    मुंबई, 7 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. वार्ड क्रमांक 5 अशोकवनचा (Ward no. 5 Ashokvan BMC) विचार केला तर या वार्डात अशोकवन, चोगले नगर, गणेश नगर, चिंतामणी नगर, एसटी डेपो आदी भागांचा समावेश आहे. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 5 बद्दल. वार्ड क्रमांक 5 हा महिलांसाठी आरक्षित आहे. 2017च्या निवडणुकीत या वार्डात शिवसेनेची (Shivsena) जादू चालताना दिसली होती. याठिकाणाहून त्यावेळी शिवसेनेचे संजय शंकर घाडी हे निवडून आले होते. त्यांना 11659 इतकी मते मिळाली होती. या वार्डात एकूण मते ही 25220 इतकी होती. तर एकूण मतदार हे 40339 इतके होते. तर याबरोबरच नोटा मिळालेल्या मतांची संख्याही लक्षणीय होती. नोटाला 539 इतकी मते मिळाली होती. त्यावेळी सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. 2017च्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 5मधील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते पुढीलप्रमाणे -
    1. संजय शंकर घाडी, शिवसेना - 11659
    2. मोतीभाई लल्लूभाई देसाई, भाजप - 9638
    3. विमोल सुरेश मयेकर, मनसे - 2417
    4. उमेश मोहन सोनसुरकर, काँग्रेस - 967
    5. नोटा - 539
    2017मध्ये येथील मतदारांनी शिवसेनेला संधी दिली होती. शिवसेना उमेदवार संजय शंकर घाडी यांच्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ पडली होती. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे या वार्डात नेमकं काय होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकूणच राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या