मुंबई, 6 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल.
(BMC Election 2022) दरम्यान, या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे.
वार्ड क्रमांक 4मध्ये
(Ward no. 4) मागच्या निवडणुकीत शिवसेनेचे
(Shivsena) वर्चस्व दिसले होते. शिवसेना उमेदवार सुजाता उदेश पाटेकर याठिकाणी निवडून आल्या होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 4 बाबत.
वार्ड क्रमांक 4 म्हणजे रावळपाडा याचा समावेश आहे. याठिकाणी शिवसेननेची सत्ता आहे. शिवसेनेच्या उमेदवार सुजाता उदेश पाटेकर याठिकाणी निवडून आल्या होत्या. गेल्या निवडणुकीत त्यांना 11078 इतकी मते मिळाली होती. त्यावेळी वार्ड्मध्ये एकूण 23006 इतके मतदार आहेत. एकूण नऊ उमेदवारांनी या निवडणुकीच्या रिंगणात उडील घेतली होती. त्यावेळी सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यात शिवसेनेने सर्वांना मात देत बाजी मारली.
हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका
राज्यात सत्तांतर -
नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे.
भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी, असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे राज्यात झालेल्या सत्तांतराचा या निवडणुकीवर काय परिणाम होतो तसेच वार्ड क्रमांक 4चा विचार केला तर येथील जनता पुन्हा शिवसेनेला संधी देते की, अन्य दुसऱ्या पक्षाला, हे आगामी निवडणुकीत पाहणे महत्त्वाचे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.