Home /News /maharashtra /

BMC Election 2022 : महाराणी सईबाई विद्यामंदीर वार्डात यावेळी काय होणार? निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष...

BMC Election 2022 : महाराणी सईबाई विद्यामंदीर वार्डात यावेळी काय होणार? निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष...

वार्ड क्र. 38मध्ये तानाजी नगर, महाराणी सईबाई विद्यामंदीर, नूतन विद्यामंदीर या प्रमुख भागांचा समावेश होतो.

    मुंबई, 6 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान, या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. मुंबई महानगरपालिका देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वार्ड क्रमांक 38मध्ये (Ward no. 38) शिवसेनेने बाजी मारली होती. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी वार्ड क्रमांक 38मधून शिवसेनेचे आत्माराम चाचे याविजयी झाले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 38बाबत. वार्ड क्र. 38मध्ये महाराणी सईबाई विद्यामंदीर, नूतन विद्यामंदीर या प्रमुख भागांचा समावेश होतो. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी शिवसेनेने बाजी मारली होती. एकूम 8 उमेदवार त्यावेळी या वार्डातून निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, त्यात जनतेने शिवसेनेला कौल दिल्याचे पाहायला मिळाले. याठिकाणी सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात होते. शिवसेनेचे उमेदवार आत्माराम चाचे याठिकाणी निवडून आले होते. त्यावेळी हा वार्ड मागासवर्गीयांसाठी राखीव होता. याठिकाणी 18318 इतके मतदार आहेत. 2017मध्ये झालेल्या निवडणुकीत या वार्डात भाजपच्या भरडकर सुधीर तुकाराम यांना 2438 तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार वैभव हेमंत भरडकर यांना 2854 मते मिळाली होती. या वार्डात शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले होते. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी, असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे राज्यात झालेल्या सत्तांतराचा या निवडणुकीवर काय परिणाम होतो तसेच वार्ड क्रमांक 38चा विचार केला तर येथील जनता कोणत्या पक्षाला संधी देते, हे आगामी निवडणुकीत पाहणे महत्त्वाचे आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या