मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : वाडिया हॉस्पिटल वार्डात 2017 निवडून आलेले यशवंत जाधव शिंदे गटात, यावेळी काय असणार सत्तेचे समीकरण?

BMC Election 2022 : वाडिया हॉस्पिटल वार्डात 2017 निवडून आलेले यशवंत जाधव शिंदे गटात, यावेळी काय असणार सत्तेचे समीकरण?

नव्या प्रभागरचनेनुसार मुंबईतील वॉर्ड 209 मध्ये वाडिया हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल, हाफकिन इस्टिस्स्युट, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, आंबेडकर नगर, गोलन्जी टेकडी या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

    मुंबई, 2 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे.  वार्ड क्रमांक 209मध्ये (Ward no. 209) मागच्या निवडणुकीत शिवसेनेचे (Shivsena) वर्चस्व दिसले होते. शिवसेनेचे यशवंत जाधव (Yashwant Jadhav) याठिकाणी विजयी झाले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 209बाबत. नव्या प्रभागरचनेनुसार मुंबईतील वॉर्ड 209 मध्ये वाडिया हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल, हाफकिन इस्टिस्स्युट, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, आंबेडकर नगर, गोलन्जी टेकडी या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. वार्ड क्रमांक 209मध्ये शिवसेनेचे यशवंत जाधव हे विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे उमेदवार कांतिलाल संगोई (Kantilal Sangoi) यांचा पराभव केला होता. मागच्या वेळी सर्वच पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात शिवसेनेने बाजी मारली होती. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका मुंबई महानगरपालिकेच्या 2017 मधील सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 227 वार्ड होते. नव्या रचनेनुसार यंदा 236 वार्ड करण्यात आले. मुंबई शहरात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्चिम 3 असे नऊ वार्ड वाढवण्यात आले. राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच वार्ड क्रमांक 209मध्ये मागच्या वेळेस निवडून आलेले यशवंत जाधव यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे यावेळी या वार्डात काय होते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या