मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : फेरबंदर, जिजामाता उद्यान वार्ड शिवसेनेचा बालेकिल्ला, काय असणार यावेळची समीकरणं?

BMC Election 2022 : फेरबंदर, जिजामाता उद्यान वार्ड शिवसेनेचा बालेकिल्ला, काय असणार यावेळची समीकरणं?

या वार्डात फेरबंदर, जिजामाता उद्यान, घोडपदेव, ठक्कर इस्टेट या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो.

या वार्डात फेरबंदर, जिजामाता उद्यान, घोडपदेव, ठक्कर इस्टेट या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो.

या वार्डात फेरबंदर, जिजामाता उद्यान, घोडपदेव, ठक्कर इस्टेट या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो.

    मुंबई, 10 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात लवकरच होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. मुंबईतील वार्ड क्रमांक 208 मध्ये (Ward no. 208) मागच्या वेळी शिवसेनेने (Shivnsena) बाजी मारली होती. 2017च्या मनपा निवडणुकीत शिवसेना उमेदवार रमाकांत सखाराम रहाटे हे निवडून आले होते. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 208 बाबत. 208 हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तसेच हा वार्ड क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही मोठा आहे. या वार्डात फेरबंदर, जिजामाता उद्यान, घोडपदेव, ठक्कर इस्टेट या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो. येथील लोकसंख्या ही 57121 इतकी आहे. त्यात अनुसूचित जाती 2152 आणि अनुसूचित जमातीचे 347 नागरिक आहेत. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी शिवसेनेने बाजी मारली होती. मागच्या वेळी याठिकाणी तब्बल 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार आणि पक्ष रमाकांत सखाराम रहाटे, शिवसेना किरण शंकर टकले, मनसे खान उमरसाद मोहम्मद, AIMIM प्रसाद घाडीगावकर, काँग्रेस राकेश जेजुरकर, भाजप मोहम्मद हमिफ खान, सपा सुशांत सुभाष शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंकज वसंत खरमाळे, संभाजी ब्रिगेड शाह अकबर अली अब्दुल, भारतीय अल्पसंख्याक सुरक्षा महासंघ सुनील देवू यादव, बसपा मोहम्मद इंतेखाब मोहम्मद शमी खान, अपक्ष मोहम्मद राफिक कलीमुल्ला खान, अपक्ष हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर - मुंबई महानगर पालिकेत सध्या शिवसेनेचा भगवा फडकात आहे. मात्र, नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या परिस्थितीत आता वार्ड क्रमांक 208मधील कोणत्या पक्षाला निवडून देते, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या