मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : कॉटनग्रीन वार्डात 2017मध्ये शिवसेनेचा विजय; यावेळी सत्तेची गणितं बदलली

BMC Election 2022 : कॉटनग्रीन वार्डात 2017मध्ये शिवसेनेचा विजय; यावेळी सत्तेची गणितं बदलली

वार्ड क्रमांक 206 कॉटनग्रीन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काट्याची लढत झाली होती.

वार्ड क्रमांक 206 कॉटनग्रीन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काट्याची लढत झाली होती.

वार्ड क्रमांक 206 कॉटनग्रीन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काट्याची लढत झाली होती.

  मुंबई, 7 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय विशेष आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 206 बद्दल. वार्ड क्रमांक 206 कॉटनग्रीन (Ward no. 206 Cotton Green) बाबत बोलायचे झाले तर याठिकाणी शिवसेनेचे (Shivsena) वर्चस्व दिसून आले होते. याठिकाणी 2017च्या मनपा निवडणुकीत शिवसेनेचे सचिन देवदास पडवळ निवडून आले होते. वार्ड क्रमांक 206 कॉटनग्रीन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काट्याची लढत झाली होती. विजयी शिवसेना उमेदवार सचिन देवदास पडवळ यांना 7225 मते मिळाली होती. तर काँग्रेसचे रामवचन सिताराम मुराई यांना 6262 इतकी मते मिळाली होती. त्यावेळी 20568 मते वैध ठरली होती. या वार्ड क्रमांक 206 मध्ये सेवरी फोर्ट, ब्रीक बंदर, भीमनगर, टिळकनगर पोलीस स्टेशन, कॉटन ग्रीन या भागांचा समावेश होतो. त्यावेळी येथील लोकसंख्या 47232 इतकी होती. त्यात अनुसूचित जाती 7868 आणि अनुसूचित जमातीची 329 लोकसंख्या होती. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते पुढीलप्रमाणे -
  1. सचिन देवदास पडवळ, शिवसेना - 7225
  2. रामवचन सिताराम मुराई, काँग्रेस - 6262
  3. विजय लक्ष्मण म्हात्रे, भाजप - 2602
  4. नील नंदकुमार शिवडीकर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 637
  5. चेतन रमेश पेडणेकर, मनसे - 1440
  6. नोटा - 186
  हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: BMC, Election, Mumbai

  पुढील बातम्या