मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : करी रोड पूर्व वार्डात मागच्या वेळी शिवसेनेचे वर्चस्व, यावेळच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष

BMC Election 2022 : करी रोड पूर्व वार्डात मागच्या वेळी शिवसेनेचे वर्चस्व, यावेळच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष

वार्ड क्रमांक 203 हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे याठिकाणची निवडणूक नेहमीच रंजक होते.

वार्ड क्रमांक 203 हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे याठिकाणची निवडणूक नेहमीच रंजक होते.

वार्ड क्रमांक 203 हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे याठिकाणची निवडणूक नेहमीच रंजक होते.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 11 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 203 करी रोड पूर्वमध्ये (Ward no. 203) मागच्या वेळी शिवसेनेचा (Shivsena) विजय झाला होता. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी शिवसेनेचे मसुरकर सिंधू रविंद्रनाथ हे विजयी झाले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमाक 203 बाबत. वार्ड क्रमांक 203 हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे याठिकाणची निवडणूक नेहमीच रंजक होते. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी शिवसेनेचे उमेदवार मसुरकर सिंधू रविंद्रनाथ हे विजयी झाले होते. त्या या निवडणुकीत 14,540 इतकी मते मिळाली होती. 2017 च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते पुढीलप्रमाणे - मसुरकर सिंधू रविंद्रनाथ, शिवसेना - 14,540 आंबोली तेजस्विनी नाना, भाजप - 9622 बाबरे रेश्मा सुधीर, अपक्ष - 262 दुर्गावाले पुनम अरुण, मनसे - 2061 जाधव मारुती जगन्नाथ, कॉंग्रेस - 1497 जाधव भारती जगन्नाथ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष - 122 नोटा - 618 हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर - नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वार्ड क्रमांक 203 चा विचार केला तर येथील जनता पुन्हा शिवसेनेला संधी देते की, अन्य दुसऱ्या पक्षाला, हे आगामी निवडणुकीत पाहणे महत्त्वाचे आहे. तसेच राज्यातील सत्तांतराचा या निवडणुकीवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या