मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : लोअर परेल वार्डात मागच्या वेळी शिवसेनेचा विजय, यावेळची परिस्थिती बदलल्याने काय असणार सत्तेची गणितं?

BMC Election 2022 : लोअर परेल वार्डात मागच्या वेळी शिवसेनेचा विजय, यावेळची परिस्थिती बदलल्याने काय असणार सत्तेची गणितं?

वार्ड क्रमांक 198 हा दक्षिण मुंबईतील एक महत्त्वाचा वार्ड आहे.

वार्ड क्रमांक 198 हा दक्षिण मुंबईतील एक महत्त्वाचा वार्ड आहे.

वार्ड क्रमांक 198 हा दक्षिण मुंबईतील एक महत्त्वाचा वार्ड आहे.

    मुंबई, 8 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. वार्ड क्रमांक 198 बाबत (Ward no.198) बोलायचे झाले तर हा वार्ड दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा वार्ड आहे. त्यामुळे याठिकाणी सर्वच राजकीय पक्ष जोर लावतात. मागच्या वेळी 2017मध्ये याठिकाणी शिवसेनेचे (Shivsena) वर्चस्व दिसले होते. शिवसेना उमेदवार स्नेहल सूर्यकांत आंबेकर या त्यावेळी निवडून आल्या होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक, 198 बाबत. वार्ड क्रमांक 198 हा दक्षिण मुंबईतील एक महत्त्वाचा वार्ड आहे. याठिकाणी सन मील लेन, मफतलाल मील, लोअर परेल (पश्चिम), वेस्टर्न रेल्वे वर्कशॉप, धुरू वाडी, गांधी नगर, एनएम जोशी पोलीस स्टेशन हा परिसर येतो. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी शिवसेना उमेदवाराला 13 हजारांहून अधिक मते मिळाली होती. शिवसेना उमेदवार स्नेहल सूर्यकांत आंबेकर यांना 13614 मते मिळाली होती. याठिकाणी प्रमुख लढत ही शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमध्ये झालेली पाहायला मिळाली. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते पुढीलप्रमाणे -
    1. स्नेहल सूर्यकांत आंबेकर, शिवसेना - 13,614
    2. विनायक (बंटी) म्हशीलकर, मनसे - 8088
    3. कुणाल रमेश कदम, रिपाइं - 1720
    4. संजय शंकर कांबळे, काँग्रेस - 1598
    5. रामचंद्र सिताराम नारकर, अपक्ष - 123
    6. मकरंद श्रीधर तासगांवकर, अपक्ष - 964
    हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका 2017मध्ये याठिकाणी एकूण 49547 मतदार होते. त्यापैकी 26326 वैध मते प्राप्त झाली होती. तर एक मत अवैध गणले गेले. याबरोबरच नोटाला 964 मते मिळाली होती. प्रमुख पक्षांसह एकूण सहा जण निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात शिवसेनेने बाजी मारली होती. नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे वार्ड क्रमांक 198मधील मतदार कुणा पक्षाच्या उमेदवाराच्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ घालतात, हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.  राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या