मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : बीडीडी चाळ वार्डात मागच्या वेळी मतदारांची शिवसेनेला साथ, आता पक्षातच दोन गट; काय असणार सत्ता समीकरण?

BMC Election 2022 : बीडीडी चाळ वार्डात मागच्या वेळी मतदारांची शिवसेनेला साथ, आता पक्षातच दोन गट; काय असणार सत्ता समीकरण?

वार्ड क्रमांक 195 मध्ये बीडीडी चाळ, रेल्वे कॉलनी, लोअर परेल (पश्चिम), तुलसी पाइप रोड, लोढा पार्क हा भाग येतो.

वार्ड क्रमांक 195 मध्ये बीडीडी चाळ, रेल्वे कॉलनी, लोअर परेल (पश्चिम), तुलसी पाइप रोड, लोढा पार्क हा भाग येतो.

वार्ड क्रमांक 195 मध्ये बीडीडी चाळ, रेल्वे कॉलनी, लोअर परेल (पश्चिम), तुलसी पाइप रोड, लोढा पार्क हा भाग येतो.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 30 जुलै : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात लवकरच होणार आहे. (BMC Election 2022) त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. राजकीय पक्षांनीही या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 195 बीडीडी चाळमध्ये (Ward no 195 BDD Chawl) मागच्या वेळी 2017ला शिवसेनेचे (Shivsena) वर्चस्व दिसून आले होते. याठिकाणी त्यावेळी शिवसेना उमेदवार संतोष खरात निवडून आले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 195 बाबत. वार्ड क्रमांक 195 मध्ये बीडीडी चाळ, रेल्वे कॉलनी, लोअर परेल (पश्चिम), तुलसी पाइप रोड, लोढा पार्क हा भाग येतो. 2017मध्ये याठिकाणी मागच्या वेळी शिवसेनेचे संतोष खरात यांनी निवडणूक जिंकली होती. त्यांना 10811 इतकी मते मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावरील भाजप उमेदवाराला फक्त 4838 इतकी मते मिळाली होती. त्यामुळे आकडेवारीचा विचार केला तर याठिकाणी शिवसेनेने एकतर्फी विजय मिळवला होता. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते पुढीलप्रमाणे -
  1. अॅड. संतोष नामदेव खरात, शिवसेना - 10811
  2. सुशील सखाराम शीलवंत, भाजप - 4838
  3. अजय किशोर शिंदे, काँग्रेस - 2645
  4. इन्सुलकर वनिता वसंत - राष्ट्रवादी काँग्रेस - 2603
  5. जितेंद्र सुदाम दोडके, भारिप बहुजन महासंघ - 1892
  6. शरद सीताराम शिरिषकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) - 274
याठिकाणी एकूण मतदारांची संख्या ही 48759 इतकी होती. त्यापैकी 26842 वैध मते ठरले होते. तसेच नोटालाही 228 मते पडली होती. मागच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने भाजप पुन्हा एकदा नव्या जोमाने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे या वार्डात काय होते, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या