मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : वार्ड क्र. 194 सेन्च्युरी मिल शिवसेनेचा गड, मात्र यावेळी पक्षातच दोन गट; समीकरणं बदलणार?

BMC Election 2022 : वार्ड क्र. 194 सेन्च्युरी मिल शिवसेनेचा गड, मात्र यावेळी पक्षातच दोन गट; समीकरणं बदलणार?

वार्ड क्रमांक 194 सेन्च्युरी मिल येथे शिवसेनेचे वर्चस्व पाहायला मिळाले. 2017च्या निवडणुकीत शिवसेना उमदेवार समाधान सदा सरवणकर यांना 8623 मते मिळाली होती.

वार्ड क्रमांक 194 सेन्च्युरी मिल येथे शिवसेनेचे वर्चस्व पाहायला मिळाले. 2017च्या निवडणुकीत शिवसेना उमदेवार समाधान सदा सरवणकर यांना 8623 मते मिळाली होती.

वार्ड क्रमांक 194 सेन्च्युरी मिल येथे शिवसेनेचे वर्चस्व पाहायला मिळाले. 2017च्या निवडणुकीत शिवसेना उमदेवार समाधान सदा सरवणकर यांना 8623 मते मिळाली होती.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 9 ऑगस्ट : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. वार्ड क्रमांक 194 सेन्च्युरी मिल हा (Ward no. 194 BMC) शिवसेनेचा (Shivsena) गड मानला जातो. मागच्या वेळी याठिकाणी समाधान सदा सरवणकर हे विजयी झाले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 194 बाबत. वार्ड क्रमांक 194 सेन्च्युरी मिल येथे शिवसेनेचे वर्चस्व पाहायला मिळाले. 2017च्या निवडणुकीत शिवसेना उमदेवार समाधान सदा सरवणकर यांना 8623 मते मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमदेवार महेश बळीराम सावंत होते. त्यांना 8364 इतकी मते मिळाली होती. 2017च्या निवडणुकीतील उमदेवार, पक्ष आणि मिळालेली मते - समाधान सदा सरवणकर, शिवसेना - 8623 महेश बळीराम सावंत, अपक्ष - 8364 संतोष बाळकृष्ण धुरी, मनसे - 6684 धावले सुर्यकांत (बाबू) लक्ष्मण, भाजप - 5112 पवार नंदकिशोर आनंदराव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 1069 संगठन शर्मा, बहुजन विकास आघाडी - 95 अधिकारी दिवानसिंग उमेदसिंध – बहुजन समाजवादी पार्टी – 152 अपर्णा आ. दळवी, जनता दल (सेक्युलर) - 41 एकनाथ सखाराम माने, भारतीय कम्युनिस्ट पक्ष - 77 अजय सिंह, अपक्ष - 899 सुर्वे सुदर्शन प्रभाकर, अपक्ष - 228 अभिषेक आनंद चव्हाण, अपक्ष -109 पाताडे विनोद श्रीधर, अपक्ष - 261 आकडेवारीचा विचार केला तर वार्ड क्रमांक 194मध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यात शिवसेनेने बाजी मारली होती. एकही उमेदवार शिवसेनेचा विजयरथ रोखू शकला नाही. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर - दरम्यान, नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे या वार्डातील जनता कुणाला साथ देते, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या