मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : वडाळा आरटीओ, विजयनगर वार्डात 2017ला शिवसेनेची जादू, यावेळी काय असणार सत्ता समीकरण?

BMC Election 2022 : वडाळा आरटीओ, विजयनगर वार्डात 2017ला शिवसेनेची जादू, यावेळी काय असणार सत्ता समीकरण?

2017च्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 180 हा ओबीसी महिलांसाठी राखीव होता.

2017च्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 180 हा ओबीसी महिलांसाठी राखीव होता.

2017च्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 180 हा ओबीसी महिलांसाठी राखीव होता.

  मुंबई, 29 जुलै : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात लवकरच होणार आहे. (BMC Election 2022) त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. राजकीय पक्षांनीही या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 180चा (Ward no. 180) विचार केला तर याठिकाणी मागच्या वेळी शिवसेनेने (Shivsena) बाजी मारली होती. याठिकाणी 2017च्या निवडणुकीत शिवसेनेच्या स्मिता शरद गावकर या निवडून आल्या होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 180 बाबत. वार्ड क्रमांक 180 मध्ये वडाळा आरटीओ, विजयनगरचा प्रभाग आहे. या वॉर्डमध्ये वडाळा आरटीओ, विजयनगरसह म्हाडा ट्रांझिड कॅम्प, वडाळा ट्रॅक, चांदणीनगर, प्रियदर्शनी विद्यामंदीर ज्यूनियर कॉलेज, आदर्श स्कूल, दोस्ती आर्केड, संगमनगर, शिवशंकर नगर, गणेश नगर या भागांचा समावेश होतो. 2017च्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 180 हा ओबीसी महिलांसाठी राखीव होता. त्यावेळी याठिकाणी शिवसेना उमदेवार स्मिता शरद गावकर या निवडून आल्या होत्या. या वार्डात शिवसेनेचे वर्चस्व आहे, असेच आकडेवारीवरुन दिसते. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार आणि पक्ष पुढीलप्रमाणे -
  1. स्मिता शरद गावकर - शिवसेना
  2. बिंदू यादव - भाजप
  3. वैशाली धर्मेंद्र पाठक - भाजप
  4. तेजस्विनी रमेश नाकती - मनसे
  5. डॉ. कुरेशी साबिका मोहम्मद हसन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
  6. आरती मंगेश पाटील, भारतीय शेतकरी कामगार पक्ष
  7. श्वेताताई कोकाटे, अपक्ष
  8. शमशाद आदम कुरेशी, अपक्ष
  या वार्डाची लोकसंख्या 51808 आहे. त्यात अनुसूचित जातीची 2695 तर अनुसूचित जमातीचे 699 नागरिक आहेत. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महागरपालिकेची सर्वांना उत्सुकता लागली आहे. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मागच्या वेळी वार्ड क्रमांक 180 याठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले होते. यावेळी कुणाला साथ देतात ते निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: BMC, Election, Mumbai

  पुढील बातम्या