Home /News /maharashtra /

BMC Election 2022 : म्हैसूर कॉलनी, भक्तीपार्क वार्डातील परिस्थिती काय? सत्ता समीकरणं बदलणार?

BMC Election 2022 : म्हैसूर कॉलनी, भक्तीपार्क वार्डातील परिस्थिती काय? सत्ता समीकरणं बदलणार?

वार्ड क्र. 155 मध्ये या प्रभागात म्हैसूर कॉलनी, माहुल गाव, सुमन नगर, भारत पेट्रोलियम रिफायनरी, भक्तीपार्क ही प्रमुख ठिकाणे येतात.

    मुंबई, 5 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान, या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे.  मुंबई महानगरपालिका देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वार्ड क्रमांक 155 मध्ये शिवसेनेने बाजी मारली होती. (Ward no. 155) 2017च्या निवडणुकीत याठिकाणी वार्ड क्रमांक 155 मधून शिवसेनेचे श्रीकांत गोविंद शेट्ये हे विजयी (Shivsena Candidate) झाले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 155 बाबत. वार्ड क्र. 155 मध्ये या प्रभागात म्हैसूर कॉलनी, माहुल गाव, सुमन नगर, भारत पेट्रोलियम रिफायनरी, भक्तीपार्क ही प्रमुख ठिकाणे येतात. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी शिवसेनेने बाजी मारली होती. शिवसेनेचे श्रीकांत गोविंद शेट्ये, हे याठिकाणी निवडून आले होते. त्यांना या निवडणुकीत 8013 इतकी मते मिळाली होती. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते पुढीलप्रमाणे -
    1. श्रीकांत गोविंद शेट्ये, शिवसेना 8013
    2. नगराळे राजेंद्र श्रीराम, काँग्रेस - 5199
    3. पोळ प्रविण परमेश्वर, भारिप बहुजन महासंघ - 2954
    4. आप्पासाहेब आनंदाराव आवचारे, राष्ट्रीय समाज पक्ष - 2653
    5. अॅड. विज्ञान शाम डावरे, अपक्ष - 143
    6. दुनबळे उत्तम दामोदर, मनसे - 3587
    7. गायकवाड विष्णू भानुदास, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 973
    8. घोक्षे रमेश गोपीनाथ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) - 1122
    9. काळे सचिन विश्वानाथ, अपक्ष - 176
    10. कांबळे विनोद परमेश्वर, एआयएमआयएम - 566
    11. विद्यानंद लक्ष्मण खरात, अपक्ष - 78
    12. मोकल मनिषा सचिन, अपक्ष - 34
    13. जयाताई प्रमोद पगारे, बहुजन समाज पार्टी - 326
    14. रामफुले मधुकर लक्ष्मण, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी 312
    15. नोटा - 778
    एकूण - 26971 वार्ड क्रमांक 155 सुमन नगर (एम-पश्चिम प्रभाग) मधील एकूण लोकसंख्या ही 61530 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीचे 11551 तर अनुसूचित जमातीचे 841 नागरिक राहतात. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी, असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे राज्यात झालेल्या सत्तांतराचा या निवडणुकीवर काय परिणाम होतो तसेच वार्ड क्रमांक 155चा विचार केला तर येथील जनता कोणत्या पक्षाला, हे आगामी निवडणुकीत पाहणे महत्त्वाचे आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या