मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : मागच्या वेळी रमाई नगर वार्डात शिवसेनेचा विजय; आता पक्षातच दोन गट, त्यामुळे निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष

BMC Election 2022 : मागच्या वेळी रमाई नगर वार्डात शिवसेनेचा विजय; आता पक्षातच दोन गट, त्यामुळे निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष

वार्ड क्रमांक 135 रमाई नगरात मागच्या वेळी सर्वच वेळी स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

वार्ड क्रमांक 135 रमाई नगरात मागच्या वेळी सर्वच वेळी स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

वार्ड क्रमांक 135 रमाई नगरात मागच्या वेळी सर्वच वेळी स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 10 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 135मध्ये रमाई नगरात (Ward no. 135 Ramai Nagar) मागच्या वेळी शिवसेनेच्या उमेदवार (Shivsena Candidate) विजयी झाल्या होत्या. शिवसेनेच्या समिक्षा सक्रे या फक्त फक्त 700 मतांनी याठिकाणी निवडून आल्या होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 21 बाबत. वार्ड क्रमांक 135 रमाई नगरात मागच्या वेळी सर्वच वेळी स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी शिवसेनेने याठिकाणी बाजी मारली होती. मात्र, फक्त 700 मतांनी याठिकाणी शिवसेना उमदेवार समिक्षा सक्रे या याठिकाणी विजयी झाल्या होत्या. मतदानाची आकडेवारी पाहिली तर त्यांना याठिकाणी शिवसेनेला विजयासाठी तारेवरची कसरत करावी लागली होती. मागच्या वेळी 15763 इतके वैध मतदान झाले होते. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते - सक्रे समिक्षा दिपक, शिवसेना -  2804 कैशाली रामकुमार वर्मा, अपक्ष -  2103 रिया योगेश बर्गे, भाजपा - 1941 सुब्राती खतिजा बी बशीर अहमद, एआयएमआयएम - 1701 चौधरी शाहीन फझलुर रहेमान, सपा - 1362 पवार अश्विनी किसन, आरपीआय - 1315 पेटकर सुरय्या शब्बीर, अपक्ष - 1033 निर्मलादेवी वसंत सिंह, काँग्रेस - 933 थोरात सुनंदा विजय, भारतीय शेतकरी कामगार पक्ष - 317 झरीना बेगम शाऊल हमीद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 155 मीना नरेंद्र बसके, अपक्ष - 57 अश्विनी सतीश गायकवाड, बहुजन विकास आघाडी - 160 जयस्वाल पल्लवी सरोज, बहुजन समाज पार्टी - 850 कुरमा बाबासाहेब काशीद, अपक्ष - 386 शोभाताई वसंत खिरवले, अपक्ष - 339 रुपाली निलेश पाटील, अपक्ष - 234 नोटा – 73 हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर या वार्डात मागच्या वेळची निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी पाहिली तर शिवसेना काठावर पास झाली होती, असे दिसते. म्हणून यावेळी काय होते, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या