मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : आयआयटी पवई, मोरारजी नगर वार्डात मागच्या वेळी शिवसेनेची जादू; यावेळी पक्षातच दोन गट, काय असणार सत्ता समीकरण?

BMC Election 2022 : आयआयटी पवई, मोरारजी नगर वार्डात मागच्या वेळी शिवसेनेची जादू; यावेळी पक्षातच दोन गट, काय असणार सत्ता समीकरण?

वार्ड क्रमांक 121 मध्ये आयआयटी पवई, पासपोली, मयुर नगर, पवई तलाव, मोरारजी नगर या विभागांचा समावेश होतो. या वार्डात झोपडपट्टी वस्ती कमी आहे.

वार्ड क्रमांक 121 मध्ये आयआयटी पवई, पासपोली, मयुर नगर, पवई तलाव, मोरारजी नगर या विभागांचा समावेश होतो. या वार्डात झोपडपट्टी वस्ती कमी आहे.

वार्ड क्रमांक 121 मध्ये आयआयटी पवई, पासपोली, मयुर नगर, पवई तलाव, मोरारजी नगर या विभागांचा समावेश होतो. या वार्डात झोपडपट्टी वस्ती कमी आहे.

 • Published by:  News18 Desk
मुंबई, 29 जुलै : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात लवकरच होणार आहे. (BMC Election 2022) त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. राजकीय पक्षांनीही या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 121चा (Ward no. 121 BMC) विचार केला तर याठिकाणी शिवसेनेचे (Shivsena) वर्चस्व आहे. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी शिवसेना उमदेवार चंद्रावती शिवाजी मोरे या निवडून आल्या होत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 121 बाबत. वार्ड क्रमांक 121 मध्ये आयआयटी पवई, पासपोली, मयुर नगर, पवई तलाव, मोरारजी नगर या विभागांचा समावेश होतो. या वार्डात झोपडपट्टी वस्ती कमी आहे. तर मात्र, वार्ड विस्तारलेला आहे. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी शिवसेनेच्या उमेदवार चंद्रावती शिवाजी मोरे या विजयी झाल्या होत्या. त्यांना 4769 इतकी मते मिळाली होती. 2017मध्ये वार्ड क्रमांक 121 हा अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव होता. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते पुढीलप्रमाणे -
 1. चंद्रावती शिवाजी मोरे, शिवसेना - 4769
 2. जगदेवी रतनदिप बनसोडे, आरपीआय (ए) - 324
 3. प्रतिमा राजीव वीर, बहुजन मुक्ती पार्टी - 153
 4. सुषमा प्रकाश बिऱ्हाडे, बसपा - 1158
 5. वर्षा कारभारी दवंडे, एमआयएम - 492
 6. हेमलता प्रशांत पालवणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 212
 7. वैशाली सचिन सकटे, मनसे - 2274
 8. अनम शेरजादा खान, काँग्रेस - 2010
 9. वंदना संतोष सोनावणे, भारिप बहुजन महासंघ - 300
 10. प्रज्ञा सुखदेव गायकवाड, अपक्ष - 1417
 11. इंदू दामोदर पाईकराव, अपक्ष - 191
 12. दीपिका विजय जाधव, संभाजी ब्रिगेड - 266
 13. ज्योत्स्ना विजय सोरटे, अपक्ष - 27
 14. नोटा - 324
वॉर्ड क्रमांक 121मध्ये एकूण मतदारांची संख्या 58633 इतकी आहे. यात अनुसूचित जातीची मतदारांची संख्या 10945, तर अनुसूचित जमातीच्या मतदारांची संख्या 408 इतकी आहे. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यात वार्ड क्रमांक 121मध्ये झोपडपट्टी भाग येत असल्यामुळे येथील समस्या अजूनही कायम आहेत. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विजयी उमेदवाराने मागच्या पाच वर्षात काय कामे केलीत, यावरही लक्ष राहणार आहे. नेमकं काय होतं ते निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या