मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : शिवसेनेत दोन गट; बोरीवली, नॅशनल पार्क वार्डात यावेळी काय नेमकं काय होणार?

BMC Election 2022 : शिवसेनेत दोन गट; बोरीवली, नॅशनल पार्क वार्डात यावेळी काय नेमकं काय होणार?

याठिकाणी शिवसेनेच्या गीता संजय सिंघन या विजयी झाल्या होत्या. त्यांना 9005 इतकी मते मिळाली होती.

याठिकाणी शिवसेनेच्या गीता संजय सिंघन या विजयी झाल्या होत्या. त्यांना 9005 इतकी मते मिळाली होती.

याठिकाणी शिवसेनेच्या गीता संजय सिंघन या विजयी झाल्या होत्या. त्यांना 9005 इतकी मते मिळाली होती.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 13 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. बोरीवली - नॅशनल पार्क वार्ड क्रमांक 12मधील (Ward no. 12) विचार केला तर याठिकाणी शिवसेनेने (Shivsena) बाजी मारली होती. शिवसेनेच्या उमेदवार गीता सिंघन याठिकाणी विजयी झाल्या होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 12 बाबत. मुंबईतील वार्ड क्रमांक 12मध्ये सुधीर फडके उड्डाण पूल व पश्चिम रेल्वे लाइनच्या जंक्शनपासून पश्चिम बाजूने लोकमान्य टिळक रोडपर्यंत, डॉ. श्याम प्रसाद चौक, दत्तपाडा रोड, बोरसपाडा रोड, देरासार लेन, देवनगर, हरिदास नगर, एसपीएम पार्क, रामदास सूत्राळे जंक्शनपर्यंत, उषा नगर रोड, प्रेमनगर रोड, देवीदास रोड, विवेकानंद नगर, पोईसर बस डेपो या भागांचा समावेश होतो. हा वार्ड सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आला आहे. वार्ड क्रमांक 12मध्ये मागच्या वेळी शिवसेनेने बाजी मारली होती. याठिकाणी शिवसेनेच्या गीता संजय सिंघन या विजयी झाल्या होत्या. त्यांना 9005 इतकी मते मिळाली होती. या वार्डात भाजप आणि शिवसेनेमध्ये काट्याची लढत झाल्याचे पाहायला मिळाले होते. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते - गीता संजय सिंघन, शिवसेना - 9005 विक्रम चोगले, भाजप - 6695 शिवानी पवार, मनसे - 1064 अमोल नाइक, अपक्ष - 2356 हेमंत पांडे, काँग्रेस - 788 अजय देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस - 745 हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच मागील पाच वर्षात शिवसेना नगरसेविकेने कोणती कामे केलीत, जनतेशी कसा संपर्क ठेवला, यावरही निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. त्यामुळे या वेळच्या निवडणुकीत मतदार कुणाला कौल देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या