मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : निर्मल नगर, पंजाबी कॉलनी वार्डात मागच्या वेळी शिवसेना विजयी, यावेळी काय होणार?

BMC Election 2022 : निर्मल नगर, पंजाबी कॉलनी वार्डात मागच्या वेळी शिवसेना विजयी, यावेळी काय होणार?

वार्ड क्रमाक 115 मध्ये निर्मल नगर, जयदेव सिंग नगर पंजाबी कॉलनी, रामनगर, दिना बामा ईस्टेट , आंबेडकर नगर, एम.एम. आर. डी. ए. कॉलनी, आंबेडकरनगर, एम.एम.आर.डी.ए. कॉलनी या भागांचा समावेश आहे.

वार्ड क्रमाक 115 मध्ये निर्मल नगर, जयदेव सिंग नगर पंजाबी कॉलनी, रामनगर, दिना बामा ईस्टेट , आंबेडकर नगर, एम.एम. आर. डी. ए. कॉलनी, आंबेडकरनगर, एम.एम.आर.डी.ए. कॉलनी या भागांचा समावेश आहे.

वार्ड क्रमाक 115 मध्ये निर्मल नगर, जयदेव सिंग नगर पंजाबी कॉलनी, रामनगर, दिना बामा ईस्टेट , आंबेडकर नगर, एम.एम. आर. डी. ए. कॉलनी, आंबेडकरनगर, एम.एम.आर.डी.ए. कॉलनी या भागांचा समावेश आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 29 जुलै : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात लवकरच होणार आहे. (BMC Election 2022) त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. राजकीय पक्षांनीही या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 115 बाबत. वार्ड क्रमाक 115 मध्ये निर्मल नगर, जयदेव सिंग नगर, पंजाबी कॉलनी, रामनगर, दिना बामा ईस्टेट , आंबेडकर नगर, एमएमआरडीए कॉलनी, या भागांचा समावेश आहे. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी शिवसेनेने बाजी मारली होती. शिवसेना उमेदवार उमेश माने हे या ठिकाणी निवडून आले होते. त्यांना 8232 मते मिळाली होती. त्यांनी प्रमुख विरोधी पक्ष भाजपच्या उमेदवाराला हरवले होते. भाजपचे उमेदवार जितेंद्र दत्तात्रय घाडीगावकर यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, काँग्रेस आणि मिळालेली मते -
  1. उमेश माने, शिवसेना - 8232
  2. जितेंद्र घाडीगावकर, भाजप - 4949
  3. अनिल राजभोज, अपक्ष - 2503
  4. काशिनाथ कराडकर, काँग्रेस - 2353
  5. वैष्णवी सरफरे, मनसे - 2678
  6. नवाझ कुरेशी, बसप - 191
  7. यासीन कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 1335
  8. राजू पठारे, अपक्ष - 95
  9. राजेंद्र वाघ, अपक्ष - 55 याबरोबरच आणखी तीन अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
या वार्डात एकूण मतदारांची संख्या ही 48336 इतकी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची 1962 तर अनुसूचित जमातींची 437 नागरिक आहेत. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले होते. तर भाजप उमेदवाराचा दारूण पराभव झाला होता. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. देशातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे. त्यामुळे वार्ड क्रमांक 115मधील नागरिक पुन्हा शिवसेना उमेदवाराला संधी देतात की, अन्य दुसऱ्या पक्षाच्या उमदेवाराच्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ घालतात हे तर निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
First published:

Tags: BJP, BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या