मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'शिवतीर्था'पाठोपाठ शिंदे गटाने मुंबई कोर्टातही अडवली शिवसेनेची वाट, शुक्रवारी होणार सुनावणी

'शिवतीर्था'पाठोपाठ शिंदे गटाने मुंबई कोर्टातही अडवली शिवसेनेची वाट, शुक्रवारी होणार सुनावणी

'
शिवसेना ठाकरे गटाची याचिका कोर्टाची दिशाभूल करणारी आहे. एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे'

' शिवसेना ठाकरे गटाची याचिका कोर्टाची दिशाभूल करणारी आहे. एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे'

' शिवसेना ठाकरे गटाची याचिका कोर्टाची दिशाभूल करणारी आहे. एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे'

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 22 सप्टेंबर : मुंबईतील दादर परिसरात छत्रपती शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास मुंबई पालिकेनं परवानगी नाकारली आहे. त्यामुळे शिवसेनेनं मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली. पण, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनीही शिवसेनेच्या याचिकेवर आक्षेप घेतला आहे. शिवाजी पार्कबाबत दाखल याचिकेवर उद्या शुक्रवारी 12 वाजता सुनावणी होणार आहे. शिवाजी पार्क प्रकरणात शिंदे गटाची मुंबई उच्च न्यायालयात मध्यस्थ याचिका दाखल केली आहे. आमदार सदा सरवणकर यांनी याचिका दाखल केली आहे. दरवर्षीप्रमाणे आपल्याच अर्जाला परवानगी देण्याची याचिकेत मागणी केली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्या करिता आपला अर्ज पालिकेकडे गेल्याचा त्यांचा दावा आहे. खरी शिवसेना ठाकरे गट असल्यामुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळावं असं शिवसेनेनं याचिकेत म्हटलं आहे. थोड्याच वेळात शिवाजी पार्क मैदानाबाबत कोर्टात सुनावणी होणार आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटांनी शिवाजी पार्कवर मेळाव्याबाबत बीएमसीकडे परवानगी मागितली होती. पण निर्णय द्यायला महापालिकेनं उशीर केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटानं न्यायालयात धाव घेतली आहे. (Shiv Sena Dasara Melava : शिवसेनेला मोठा धक्का, शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली!) शिवसेना ठाकरे गटाची याचिका कोर्टाची दिशाभूल करणारी आहे. एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे, असा दावाच सदा सरवणकर यांनी केला आहे. याचिकाकर्त्यांनी मुंबई हायकोर्टापासून काही महत्त्वाच्या बाबी जाणीवपूर्वक दडवल्या आहेत. खरी शिवसेना कोणती याचा वाद सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर प्रलंबित आहे. शिंदे गटाने अर्जाद्वारे निदर्शनास आणले आहे. शिवसेना पक्ष कोणाचा, हा वाद प्रलंबित असताना उद्धव ठाकरे यांचा गट आपणच खरा शिवसेना पक्ष असल्याचा दावा करत मागल्या दाराने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी हायकोर्टाची परवानगी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. हा हायकोर्टाचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, असा शिंदे गटाचा आरोप आहे. मी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचा मुख्य नेता एकनाथ शिंदे यांचा प्रतिनिधी म्हणून अर्ज केला आहे, असेही सदा सरवणकर यांनी अर्जात म्हटले आहे. ( 'मिशन मुंबई'मध्ये आता पंतप्रधान मोदींची एंट्री, मुख्यमंत्री शिंदे घेणार भेट?) त्यामुळे शिवसेनेच्या याचिकेसोबत सदा सरवणकर यांच्या याचिकेवरही सुनावणी होऊ शकते. मुंबई महापालिकेतर्फे अॅड मिलिंद साठ्ये हे बाजू मांडणार आहे तर शिवसेना ठाकरे गटातर्फे एस्पि चिनॉय हे युक्तिवाद करणार आहे. दरम्यान, शिवसेनेची याचिका दाखल झाली तेव्हा महापालिकेचं उत्तर दाखल झालेलं नव्हतं. उच्च न्यायालयात महापालिकेने उत्तर दाखल केलं आहे. शिवाजी पार्कवर कायदा सुव्यवस्थेच्या कारणाखाली पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली असं कोर्टात दाखल आपल्या उत्तरात म्हटलं आहे. त्यामुळे याचिकेत सुधारणा करण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला जाण्याची शक्यता आहे.
First published:

पुढील बातम्या