मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिंदे सरकार घेणार मोठा निर्णय, उद्धव ठाकरेंच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा 'घास' हिरावणार?

शिंदे सरकार घेणार मोठा निर्णय, उद्धव ठाकरेंच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा 'घास' हिरावणार?

रवींद्र चव्हाण या आठवड्यात अन्न व नागरी पुरवठा खात्या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेणार

मुंबई, 26 सप्टेंबर : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी अशा शिवभोजन थाळीला आता ब्रेक लागण्याची चिन्ह आहे. शिवभोजन थाळी सुरू ठेवायची की नाही याचा आढावा अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण घेणार आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर 10 रुपयांमध्ये शिवभोजन थाळी सुरू केली होती. मात्र आता शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर मविआच्या एका एका निर्णयाला स्थगिती दिली जात आहे. आता शिवभोजन थाळीबद्दल निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण या आठवड्यात अन्न व नागरी पुरवठा खात्या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेणार आहे. शिवभोजन थाळी योजना मविआ सरकारच्या काळात सुरू करण्यात आली होती.

('फडणवीसांना त्रास दिला आणि त्याच ब्राह्मणाने मराठा समाजाची झोळी 2017 ला भरली', तानाजी सावंत यांचं विधान)

मात्र ही योजना नक्की कोणाच्या फायद्याची आहे याचा आढावा घेतला जाणार आहे. शिवभोजन थाळीची खरोखर गरज आहे का, हे पाहून कॅबिनेट समोर ठेवलं जाणार आहे.  सध्या राज्यात १ लाख ८० हजार शिवभोजन थाळ्यांसाठी परवानगी आहे. त्यातील १ लाख ४० हजार थाळ्या दिवसाला खाल्या जातात. मागील सरकारने २ लाख प्लेट करण्यात याव्या असं प्रस्ताव होता. पण, आता शिवभोजन थाळी किती लोकांपर्यंत पोहोचते आणि त्याचा खर्च किती होत आहे, याचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

First published: