मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवसेनेची मोठी खेळी! पक्षाला जिथं पडलं मोठं खिंडार, तिथचं विरोधी पक्षनेता पद

शिवसेनेची मोठी खेळी! पक्षाला जिथं पडलं मोठं खिंडार, तिथचं विरोधी पक्षनेता पद

शिंदे-फडणवीस सरकारला विधान परिषदेच्या सभागृहात कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना पक्षाने आता मोठी खेळी खेळली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारला विधान परिषदेच्या सभागृहात कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना पक्षाने आता मोठी खेळी खेळली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारला विधान परिषदेच्या सभागृहात कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना पक्षाने आता मोठी खेळी खेळली आहे.

  • Published by:  Rahul Punde
मुंबई, 8 ऑगस्ट : सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेनं (Shiv Sena) विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला होता. याबाबात शिवसेनेकडून विधान परिषदेच्या सभापतींना पत्रही पाठवण्यात आले आहे. शिवसेनेशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसही यासाठी स्पर्धेत आहे. विधानपरिषदेत शिवसेनेकडे 11 सदस्य आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी 10-10 सदस्य आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेस युती करुन विरोधीपक्षनेतेपदासाठी दावा करु शकतात, असं बोललं जात होतं. मात्र, आता विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे जाणार असल्याचं दिसत आहे. कारण, यावर विधान परीषद आमदार अंबादास दानवे यांची वर्णी लागणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनिल परब यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते करतील अशी चर्चा होती. मात्र, आता आमदार अंबादास दानवे यांना हे पद देण्यात येणार असल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. पक्षात बंडखोरी झाल्यानंतर अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर सातत्याने हल्ला चढवला आहे. त्यामुळे आता सभागृहातही असाच आक्रमक चेहरा देण्याचा विचार पक्षाने केला असण्याची शक्यता आहे. शिवाय शिवसेनेला सर्वात मोठा धक्का मराठवाड्यात बसला आहे. त्यामुळे याच मराठवाड्यात पुन्हा उभारी घेण्यासाठी दानवे यांच्या नावाला पसंती दिली असण्याची शक्यता आहे. TET परीक्षेत अपात्र, तरीही अब्दुल सत्तारांच्या मुलीला 2017 पासून 40 हजार पगार, धक्कादायक प्रकार उघड महाराष्ट्र विधान परिषदेतील पक्षीय बलाबल काय? 78 सदस्यीय महाराष्ट्र विधानपरिषदेत भाजपचे 24 सदस्य आहेत. शिवसेनेचे 12 तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रत्येकी 10 - 10 सदस्य आहेत. लोक भारती, पीजेंट्स एंड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांचा प्रत्येकी एक एक सदस्य आहे. तर चार अपक्ष सदस्य आहेत. 15 जागा खाली आहेत. बंडखोरीनंतर ठाकरे सरकार कोसळलं एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसोबत बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं होतं. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या 40 आमदारांचा पाठिंबा आहे. तर उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त 15 आमदारांचा पाठिंबा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना दोन गटामध्ये विभागली आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 शिवसेना आमदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापन केली.  एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
First published:

Tags: Shivsena, Uddhav tahckeray

पुढील बातम्या