नवी दिल्ली, 18 जुलै : आमदारांनंतर आता शिवसेनेचे खासदारही शिंदे (Eknath Shinde) गटाच्या वाटेवर असल्याने शिवसेनेत (Shivsena) खळबळ उडाली आहे. खासदारांना वाचवण्यासाठी ठाकरे गटाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. शिंदे गटाच्या बैठकीला 12 शिवसेनेच्या खासदारांनी हजेरी लावल्याचं सांगितलं जात आहे. आता नागपूर जिल्ह्यातील (Nagpur News) रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि 2019 मध्ये सेनेशी बंडखोरी केलेले आशिष जयस्वाल यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हणाले आशिष जयस्वाल...
-शिवसेनेतआमदारांपेक्षा खासदारांची अवस्था वाईट होती.
-आधीच खासदारांनी बंड करणं अपेक्षित होतं. आमदारांनी आधीच हा उठाव करायला हवा होता.
-महाविकास आघाडीची खूप मोठी किंमत शिवसेनेला मोजावी लागली आहे. अगोदर अरविंद सावंत यांना केंद्रातून मंत्रिपद सोडावं लागलं.
-लवकरच मोठ्या संख्येने खासदार हेदेखील आमदारांसारखा निर्णय घेतील याबद्दल कोणतीच शंका नव्हती
-उद्या तुम्हाला सगळं चित्र स्पष्ट होईल. आगे आगे देखो क्या होता है क्या..
-संजय राऊत बोलबच्चन आहेत, एखाद्या निवडणुकीत उभे रहा आणि निवडून येऊन दाखवा.
-निवडून येणाऱ्या प्रतिनिधिला निवडून न येणाऱ्या प्रतिनिधीने टोमणे मारणे, याला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही.
-संजय राऊत यांच्या तोंडाला कोणाचं नियंत्रण नाही. उद्धव ठाकरे त्यांच्यावर कंट्रोल करू शकत नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे खासदार...
1 सदाशिव लोखंडे
2 हेमंत गोडसे
3 हेमंत पाटील
4 राजेंद्र गावित
5 संजय मंडलीक
6 श्रीकांत शिंदे
7 श्रीरंग बारणे
8 राहुल शेवाळे
9 प्रतापराव जाधव
10 धैर्यशील माने
11 कृपाल तुमाने
12 भावना गवळी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.