मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Kishori Pednekar : ...शिंदेंना भाषण फडणवीसांनीच लिहून दिलं, किशोरी पेडणेकरांचा पलटवार

Kishori Pednekar : ...शिंदेंना भाषण फडणवीसांनीच लिहून दिलं, किशोरी पेडणेकरांचा पलटवार

मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या नेत्यांना जोरदार पलटवार केला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या नेत्यांना जोरदार पलटवार केला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या नेत्यांना जोरदार पलटवार केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 06 ऑक्टोंबर : मागच्या कित्येक दिवसांपासून अखंड महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. काल झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या भाषणावर आज भाजपकडून जोरदार उत्तर देण्यात येत आहे. दरम्यान यावर मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या नेत्यांना जोरदार पलटवार केला आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या कि, आमचे पैसे आमची भाकरी विचार मात्र उद्धवजींचे ऐकायला आलोय असं अनेकांनी शिवाजी पार्क मध्ये सांगितल. स्वतःहून येणं आणि माणसं आणणं यात फरक आहे. काल शिवतिर्थावरचा मेळावा अभुतपूर्व मेळावा असल्याचे त्या म्हणाल्या. शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर तर स्टेज वर डुलक्या काढत होते. या सगळ्यांना दिसून आले आहे. तर प्रत्येक घराण्यातील भांडणं चव्हाट्यावर येतातच मात्र उद्धव ठाकरे यांनी कधी नातेवाईकांचा विरोधही केला नाही आणि भांडवल ही केलं नाही. ते काल शिंदेंकडून होताना दिसून आले.

बिकेसीमध्ये जास्त गर्दी होती असा पोलिसांचा अहवाल समोर आल्याचे विचारताच पेडणेकर म्हणाल्या कि, बिकेसीमध्ये चैतन्य होतं का साद प्रतिसाद होता का गर्दीशी आम्हाला घेणेदेणे नाही. शिंदे गटाला 20 वर्षानंतर साक्षात्कार होतोय आनंद दिघे यांच्या प्रॉपर्टीशी उद्धावजींचा संबंध काहीच नाही. परंतु बदनाम करण्यासाठी काहीही बोलण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. दरम्यान त्या शितस म्हात्रे यांच्यावर ही टीका केली आहे. मला असल्या बाईवर बोलायचं नाही. उद्धवजी कधीही बोलले नाही नी शिवसेना प्रमुख आहे माझी शिवसेना असंही म्हणले नाही ते नेहमीच पक्षप्रमुख आहेत.

दरम्यान नको ती वस्तू सुद्धा बिकेसीमध्ये होती म्हणजे ती पण सोय तिथे होती का? बाळासाहेबांच्या विचारांचा मेळावा होता मग अशी गल्लत कशी झाली असे ही त्या म्हणाल्या. फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली. 

आमची स्क्रीप्ट नव्हती तो संवाद होता स्क्रीप्ट खरं बाहेर आलं आम्ही शिंदे साहेबांना चांगलं ओळखतो हे शिंदे साहेबांचे भाषण नाही ते तुम्हीच लिहून दिलेलं भाषण होतं असे म्हणत पेडणेकर यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.

भाजप मुंबई मिळवण्यासाठी ही धडपड

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिका भाजपाच्या निशाण्यावर आहे. पण, मुंबई महापालिकेवर २५ वर्ष शिवसेनेचा भगवा फडकला. उद्धवजींवर, बाळासाहेबांवर विश्वास ठेवून लोकांनी निवडून दिलं आहे. आमदार, खासदार, काम करत असलेल्या प्रत्येकावर विश्वासा ठेवून लोकांनी शिवसेनेला निवडून आलंय, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

First published:

Tags: Shiv Sena (Political Party), Shiv sena dasara melava