मुंबई, 23 एप्रिल : भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी जोरदार दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. तर सोमय्यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. (shivsena workers attack on kirit somiya car)
किरीट सोमय्या आज रात्री खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस स्टेशनला गेले होते. यावेळी किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. किरीट सोमय्या परत जात असताना खार पोलीस स्टेशनबाहेर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगड फेकल्याचे समोर आलं आहे. यापूर्वीही अशाप्रकारे त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक झाली आहे.
सोमय्या यांच्या गाडीची काच फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. किरीट सोमय्या या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर सोमय्या यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली होती. असा दावा शिवसैनिकांनी केला आहे.
("हात नाही लावायचा...." नवनीत राणांच्या घरात पोलीस शिरले तेव्हा काय झालं, VIDEO)
याआधीही पुण्यात किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला होता 5 फेब्रुवारी रोजी किरीट सोमय्या पुणे महापालिकेत पोहोचले होते. तेव्हा शिवसैनिकांनी त्यांना अडवले. त्यावेळी सोमय्या आणि किरीट सोमय्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती.
(रशिया आणि चीनच्या युद्धनौका जपानच्या अगदी जवळ, संरक्षण मंत्रालयाने दिला दुजोरा)
सोमय्या पालिका कार्यालयात आले तेव्हा त्यांच्यात आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष बघायला मिळाला. शिवसेना कार्यकर्त्यांनी तिथे आंदोलन केलं. सोमय्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांकडून प्रचंड घोषणाबाजी झाली. विशेष म्हणजे. यावेळी धक्काबुक्की देखील झाली. सुरक्षा रक्षकांनी मोठ्या शिताफीने सोमय्या यांना सुरक्षितपणे गाडीत बसवलं आणि तिथून बाहेर काढलं. पण यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांचा रोष प्रचंड शिगेला पोहोचलेला बघायला मिळाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.