मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'..म्हणून मी कुठे हात दाखवायला जात नाही', शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

'..म्हणून मी कुठे हात दाखवायला जात नाही', शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

'कार्यक्रम रद्दकरून शिर्डीला गेले, सिन्नर हात दाखवला हे आम्हाला नवीन आहे. राज्याचा लौकिक आहे हे नवीन पाहायला मिळते'

'कार्यक्रम रद्दकरून शिर्डीला गेले, सिन्नर हात दाखवला हे आम्हाला नवीन आहे. राज्याचा लौकिक आहे हे नवीन पाहायला मिळते'

'कार्यक्रम रद्दकरून शिर्डीला गेले, सिन्नर हात दाखवला हे आम्हाला नवीन आहे. राज्याचा लौकिक आहे हे नवीन पाहायला मिळते'

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

मुंबई, 24 नोव्हेंबर : 'मी काही ज्योतिषी नाही. मुळात माझा ज्योतिषावर विश्वास नाही. त्यामुळे मी कुठे हात दाखवायला जात नाही. आत्मविश्वास नसला की मग देवदर्शनासाठीचे दौरे वाढतात, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी बेळगाव-महाराष्ट्र सीमा वाद आणि राज्यपालांच्या विधानापासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिर्डी दौऱ्यावर शरद पवारांनी भाष्य केलं.

मी काही ज्योतिषी नाही. माझा ज्योतिषावर विश्वास नाही. त्यामुळे मी कुठे हात दाखवायला जात नाही. आसाममध्ये गेले आता परत जात आहेत. कार्यक्रम रद्दकरून शिर्डीला गेले, सिन्नर हात दाखवला हे आम्हाला नवीन आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. राज्याचा लौकिक आहे हे नवीन पाहायला मिळते. असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.

'राज्यपालांचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक गोष्टींवर वादग्रस्त विधान करण्याचा त्याचा लौकिक आहे य छत्रपती शिवाजी महाराज यांचा विषयी जे भाष्य केले आहे ते निषेधार्थ आहे. संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला अश्या प्रकारचे भाष्य करणे शोभानिय नाही. कार्यक्रम संपला होता. त्यामुळे आम्हाला काय बोलले कळले नाही. राज्यपाल शेवटी बोलले. राज्यपाल विशिष्ट व्यक्ती आहे. या गोष्टीतून या पदावर जबाबदारीने भूमिका घ्यायची असते हे स्मरण नसलेली व्यक्ती महाराष्ट्रात पाठवली आहे. राज्यपाल बोलले तेव्हा मी होतो. माझ्या बाबत उल्लेख नव्हता गडकरींबाबत उल्लेख होता, असं म्हणत पवारांनी उदयनराजेंना फटकारून काढलं.

(कर्नाटक आणि पाकिस्तानमध्ये काय फरक, सीएम बोम्मईंवर नीलम गोऱ्हेंचा प्रहार)

'राज्यपाल संवैधानिक पद आहे, त्यावर अधिक बोलणार नाही. छत्रपतींबाबत बोलले सर्व मर्यादा राज्यपालांनी सोडली आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा विषयी नंतर स्तुती केली होती. हे उशिराने सुचलेलं शहाणपण आहे. याचा निर्णय राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी घेतला पाहिजे, अशी मागणीही पवारांनी केली.

'कर्नाटक सीमा प्रश्न अनेक दिवसाचा आहे. आज कर्नाटकने महाराष्ट्रातील काही गावं आमची असल्याचा दावा केला आहे हे अत्यंत चुकीचे आहे. आमची बेळगावची मागणी आहे. त्यावर चर्चा करत नाही. त्यांनी मागणी केली. आम्ही पण मागणी करतो बेळगाव कारवार ही जुनी मागणी आहे. आमच्या मागणीत सातत्य आहे. ते सांगतात काही गाव हवी आहे. काही न करता मागणी करता. हे योग्य नाही. तिथे भाजपचे राज्य आहे. यांचा आत्मविश्वास वाढला आहे, काहीही वागा मागणी करा. त्याला ते जबाबदार आहेत तसे या देशात सत्तेत बसलेले देखील आहेत, अशी टीकाही पवारांनी केली.

सीमेवर गाव दुसऱ्या राज्यात निवडणूक म्हणून सुट्टी देणे हे पहिल्यांदा ऐकलं. गुजरातमधील स्थिती चिंताजनक वाटते की काय असं चित्र आहे, असंही पवार म्हणाले.

(बोलताना तारतम्य बाळगाल की नाही? राज्यपालांच्या वक्तव्यावर उदयनराजेंचा संताप; पवार, गडकरींनाही केला सवाल! )

दोघांचं काय बोलणे झाले माहित नाही, असं म्हणत शरद पवार यांनी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवर बोलण्याचं टाळलं.

लोकप्रतिनिधींना नाउमेद करणे असे गुन्हे टाकणे असे प्रयत्न करत आहे. जितेंद्र आव्हाड विचाराचा लढ्यात तडजोड करणार नाही, असं म्हणत पवारांनी आव्हाडांची पूर्णपणे पाठराखण केली.

काल कोर्टाने म्हटले ही अतिशय स्पष्ट भूमिका सांगते. नियुक्तीमध्ये कोर्टाला बोलण्याची वेळ आली आहे. सुप्रीम कोर्ट स्पष्ट बोलत नव्हते दिसत आहे. सत्तेचा वापर केला जात आहे. निवृत्त झाले लगेच नियुक्ती झालं हे कोर्टाने पण observe केलं आहे, असंही पवार म्हणाले.

मी जाणार नाही. महिला अत्याचार विषय महत्वाचं आहे. आधी काय झालं काय सांगता, आता त्यांच्याकडे गृहखाते आहे. त्यांनी या प्रकरणावर बोललं पाहिजे, अशी प्रतिक्रिया पवार यांनी श्रद्धा वालकर हत्येप्रकरणावर दिली.

First published:

Tags: Marathi news