मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

AC लोकलबाबत शरद पवारांची थेट भूमिका; लवकरच रेल्वे मंत्र्यांची घेणार भेट!

AC लोकलबाबत शरद पवारांची थेट भूमिका; लवकरच रेल्वे मंत्र्यांची घेणार भेट!

एसी लोकलमुळे ठिकठिकाणी प्रवाशांकडून आंदोलन पुकारलं जात आहे.

एसी लोकलमुळे ठिकठिकाणी प्रवाशांकडून आंदोलन पुकारलं जात आहे.

एसी लोकलमुळे ठिकठिकाणी प्रवाशांकडून आंदोलन पुकारलं जात आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

ठाणे, 29 ऑगस्ट : एसी लोकलमुळे ठिकठिकाणी प्रवाशांकडून आंदोलन पुकारलं जात आहे. आधीच लोकलमधील गर्दी, विलंबाने चालणाऱ्या लोकल, अपूरी सेवा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यात एसी लोकल सुरू केल्यामुळे त्या वेळेत धावणारी सामान्य लोकल रद्द केली जाते, त्यामुळे पुढील लोकलवर अतिरिक्त ताण आणि गर्दी होते.

परिणामी काही दिवसांपूर्वी बदलापूर, कळवा या स्थानकांत प्रवाशांना उद्रेक पाहायला मिळाला. आज राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हा आढावा बैठकीत शरद पवारांनीही महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. सामान्य लोकांचा विचार करत एसी लोकल बंद केल्या पाहिजे, अशी थेट भूमिका यावेळी त्यांनी मांडली. यासंदर्भात लवकरच ते रेल्वे मंत्र्यासोबत बैठक घेणार असल्याचं यावेळी ते म्हणाले. राज्याच्या दौऱ्याची सुरुवात ठाण्यापासून करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

नातवासाठी आजोबा मैदानात, शरद पवारांनी भाजपला दिला इशारा, रोहित पवारांबद्दल म्हणाले...

आणखी काय म्हणाले शरद पवार..

-'रोहित पवार (rohit pawar) यांच्याबद्दल काय होणार आहे, हे भाजपच्या नेत्यांनी आधीच सांगितलं आहे. आता असं असं होणार आहे. भाजपचे काही लोक हे विरोधकांच्या घरावर असं होणार, तसं होणार, असं सांगत आहे. असा एक गट राज्यात आहेत यांना लोकं धडा शिकवतील.

-'शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी ज्या प्रकारे सांगितले आहे की, 5 वर्ष लागणार आहे. त्यामुळे काही तरी जुळलं याचा संशय येत आहे. पण, सुप्रीम कोर्टामध्ये 5 वर्ष वाट पाहण्याची गरज वाटत नाही. पुढील एक दोन सुनावण्यांमध्ये याचा निर्णय लागू शकतो

-'कोणाचे खच्चीकरण करता येईल का ईडी लावता येईल का सीबीआय लावता येईल हा सारखे प्रयोग केले जात आहे. कर्नाटकमध्ये सुद्धा असे प्रकार झाले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही लोक फोडले आणि सरकार स्थापन केले. झारखंडमध्येही आमदार फोडून सरकार स्थापन केले आहे. लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना बाजूला ठेवून आमदारांना आमिष दाखवून सत्ता घ्यायची हे भाजपा करत आहे.

First published:

Tags: Indian railway, Mumbai, Mumbai local, Sharad Pawar, Thane