मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्यपालांच्या टोपीचा रंग अन्.. कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

राज्यपालांच्या टोपीचा रंग अन्.. कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत केलेल्या एका विधानाने राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत केलेल्या एका विधानाने राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत केलेल्या एका विधानाने राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 30 जुलै : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी मुंबई येथील एका कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. कोश्यारी यांना राज्यपालपदावरून दूर करावे तसेच त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. असे असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. कोश्यारी यांच्या डोक्यावरच्या टोपीचा रंग आणि त्यांचे अंत:करण यात काहीही फरक नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. टीव्ही 9 मराठीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

“या राज्यपालांबद्दल काय बोलावं. यापूर्वी त्यांनी महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत एक भयानक विधान केले होते. त्यांनी यावेळी वेगळ्या पद्धतीने तीच पुनरावृत्ती केली. महाराष्ट्र किंवा मुंबईबद्दल त्यांनी भाष्य केले. मुंबई किंवा महाराष्ट्र सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे आहेत. मुंबईची प्रगती सर्वसामान्यांच्या कष्टातून झाली. असे असताना अशा प्रकारची विधाने करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. मी याच्या फार खोलात जात नाही. कारण राज्यपालांच्या टोपीचा रंग आणि अंत:करण यात काही फरक नाही,” असे शरद पवार म्हणाले.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील अंधेरी येथील या कार्यक्रमात बोलताना राज्यपालांनी गुजराती, राजस्थानी समाजाचं कौतुक केलं आहे. यावेळी मुंबईला आर्थिक राजधानी करण्यात गुजराती, राजस्थानी लोकांचं योगदान असल्याचं कोश्यारी म्हणाले. राजस्थानी मारवाडी समाज केवळ धनसंचय न करता शाळा, महाविद्यालये काढून गोरगरीबांची सेवा देखील करत असतो. प्रामुख्याने यात मुंबईला आर्थिक राजधानी करण्यात गुजराती आणि राजस्थानी समाजाचं योगदान आहे. जर गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असंही ते म्हणाले.

'राज्यपालांना कोल्हापूरी जोडे दाखवण्याची वेळ आलीये'; उद्धव ठाकरेंची कोश्यारींवर टोकाची टीका

राज्यपालांचे स्पष्टीकरण

"मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला. काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केलं, त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता", असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका

राज्यपालांनी केलेल्या विधानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “राज्यपालांचं विधान वैयक्तिक आहे. त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही. 106 हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं योगदान सर्वांना माहिती आहे. मराठी माणसामुळे मुंबईला नावलौकिक प्राप्त झाला आहे.” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

First published:

Tags: Governor bhagat singh, शरद पवार. sharad pawar