Home /News /maharashtra /

वर्षा राऊत ईडीच्या रडारवर; दोन टीमकडून संजय राऊत आणि वर्षा राऊतांची स्वतंत्र चौकशी

वर्षा राऊत ईडीच्या रडारवर; दोन टीमकडून संजय राऊत आणि वर्षा राऊतांची स्वतंत्र चौकशी

ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांच्या दोन टीम वर्षा राऊत आणि संजय राऊत यांची स्वतंत्र चौकशी करत आहेत. चौकशीनंतर ईडीचे अधिकारी नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.

    मुंबई, 6 ऑगस्ट : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडीच्या रडारवर आहेत. आज सकाळीच त्या ईडी कार्यालयाच चौकशीसाठी हजर झाल्या आहेत. मागील तीन तासांपासून ईडीचे अधिकारी वर्षा राऊत यांची चौकशी करत आहेत. ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांच्या दोन टीम वर्षा राऊत आणि संजय राऊत यांची स्वतंत्र चौकशी करत आहेत. चौकशीनंतर ईडीचे अधिकारी नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांना घरचं जेवण देण्याची परवानगी न्यायलायाने दिली आहे. त्यामुळे दोघांसाठी त्यांच्या मुलीने जेवणाचा डबा पोहचवला आहे. जेवणानंतर पुन्हा दोघाचीही चौकशी सुरु होणार आहे. प्रविण राऊत यांनी वर्षा राऊत यांच्या खात्यात ट्रान्सफर केलेल्या पैशातून अलिबागमध्ये जमीन खरेदीचा व्यवहार झाल्याचा संशय ईडीला आहे. त्यामुळे वर्षा राऊत यांच्या खात्याचे तपशील, जमीन व्यवहार याबाबत आज त्यांची चौकशी होऊ शकते. उमेश कोल्हेच्या हत्येनंतर डिनर पार्टीचं आयोजन; आणखी दोघांना अटक, NIA ला मोठं यश प्रविण राऊत यांना मिळालेल्या 112 कोटी रकमेपैकी काही रक्कम रोख स्वरुपात मिळाली आहे. तसंच नॅशनल आणि इंटर नॅशनल प्रवासाकरताही प्रविण राऊतने राऊत परिवाराला पैसे दिले आहेत. प्रविण राऊत दर महिन्याला संजय राऊत यांना 2 लाख रुपये देत होता, असा दावा इडीने केला आहे. यापुढे हल्ला कराल तर लक्षात ठेवा...; कर्जतमध्ये हिंदू तरुणावरील हल्ल्यावर नितेश राणेंचा इशारा सुनील राऊत यांचे गंभीर आरोप वर्षा राऊत चौकशीसाठी हजर होण्याआधी आमदार सुनील राऊत यांनी म्हटलं की, सर्व व्यवहार नियमाप्रमाणे झाले आहेत. अलिबाग येथील जमीन रेडी रेकनर पेक्षा जास्त दराने खरेदी केली आहे. 2013 ला खरेदी जमिनीवर आज जाग आली का? असा सवालही सुनील राऊत यांनी विचारला आहे. जे काही सुरु आहे ते भाजपचे षडयंत्र आहे. पत्राचाळ प्रकरणात 9 कॉन्ट्रॅक्टर्सची चौकशी करा. मोहित कंबोज यातील एक कॉन्ट्रॅक्टर आहे. भाजपमध्ये गेले की पावन होतात. शिवसेनेचे प्रताप सरनाईक, यशवंत जाधव यांचा कोट्यवधींचा घोटाळा केला. मात्र भाजपात गेले म्हणून वाचले. संजय राऊत भाजपात गेले असते तर हे बंद झालं असतं. संजय राऊत खरा प्रामाणिक माणूस असून बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहेत. उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील असा दावाही सुनील राऊत यांनी केला आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Sanjay raut, Shivsena

    पुढील बातम्या