मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

sanjay raut : संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, दुसऱ्या घरीही ईडीचा छापा

sanjay raut : संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, दुसऱ्या घरीही ईडीचा छापा


ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या परिवारातील सदस्यांची चौकशी करत आहेत. या दरम्यान संजय राऊत

ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या परिवारातील सदस्यांची चौकशी करत आहेत. या दरम्यान संजय राऊत

ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या परिवारातील सदस्यांची चौकशी करत आहेत. या दरम्यान संजय राऊत

मुंबई, 31 जुलै : पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. सकाळपासून ईडीचे अधिकारी राऊत कुटुंबीयांची चौकशी करत आहे. याच दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांच्या दादर येथील घरावरही छापा टाकला आहे.

पत्राचाळ प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना दोन वेळा समन्स बजावला होता. समन्स बजावल्यानंतरही संजय राऊत हे ईडीच्या चौकशीला हजर राहिले नाही. आज ईडीच्या टीमने सकाळी 7 वाजताच संजय राऊत यांच्या भांडुप येथील घर गाठले. सकाळपासून ईडीच्या अधिकाऱ्यांकडून राऊत कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे,  संजय राऊत यांच्या संबंधीत दोन ठिकाणीच धाडी पडल्या आहेत. कांजूरमार्ग आणि दादर येथील घरावर ईडीने छापा टाकला आहे. कांजूरमार्ग येथील मैत्री बंगला आणि दादर येथील गार्डन कोर्ट येथील घरावर हा छापा टाकला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या परिवारातील सदस्यांची चौकशी करत आहेत. या दरम्यान संजय राऊत आणि परीवारातील काही सदस्यांची समोरासमोर बसून चौकशी केली गेली.  या दरम्यान संजय राऊत यांनी ईडी अधिकाऱ्यांना पुर्ण सहकार्य केल्याचे बोलले जात आहे. शिवाय तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहेत असं देखील राऊत अधिका-यांना बोलले.

दरम्यान, संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे. त्यांचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. जबाब नोंदवल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांना जर राऊत यांना कार्यालयात घेऊन जाऊन चौकशी करायची असेल तर तसं ईडीचे अधिकारी करू शकतात. ईडीच्या कार्यालयात नेल्यानंतर अटक करायची की नाही, याचा निर्णय तिथेच घेतला जाईल,अशी माहिती सूत्रांनी दिली.

First published: