मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे खरंच भेटणार? संजय राऊतांनी दिलं हे उत्तर; उपराष्ट्रपतीपदाबाबतच्या भूमिकेबद्दल म्हणाले...

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे खरंच भेटणार? संजय राऊतांनी दिलं हे उत्तर; उपराष्ट्रपतीपदाबाबतच्या भूमिकेबद्दल म्हणाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचा ९ हजार ५०० कोटींचा निधी थांबवला. मात्र, शिवसेनेचा निधी सुरू ठेवला. हा मुख्यमंत्र्याचा निर्णय आहे. मात्र अशा प्रकारे निधी थांबवणं चुकीचं आहे. या संदर्भात चर्चा होऊ शकते, असं राऊत म्हणाले.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 17 जुलै : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यापासून आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यापासून संजय राऊत (Sanjay Raut) अनेकदा नव्या सरकारवर टीका करताना दिसतात. अनेकदा ते बंडखोर आमदारांवरही निशाणा साधतात. आता पुन्हा एकदा त्यांनी सरकावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचा ९ हजार ५०० कोटींचा निधी थांबवला. मात्र, शिवसेनेचा निधी सुरू ठेवला. हा मुख्यमंत्र्याचा निर्णय आहे. मात्र अशा प्रकारे निधी थांबवणं चुकीचं आहे. या संदर्भात चर्चा होऊ शकते, असं राऊत म्हणाले.

मी लिहून देतो की.., शिवसैनिकांकडून 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर भरून घेतले प्रतिज्ञापत्र

दरम्यान शनिवारी रात्री उशिरा शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्विट करून अशी माहिती दिली होती, की येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार आहेत. याबाबतही संजय राऊत यांना विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना ते म्हणाले, की 'मी पक्षाचा एक लहान कार्यकर्ता आहे. मला या विषयी माहिती नाही.'

यासोबतच राऊत यांनी सरकारवर निशाणा साधत हे सरकार बेकायदेशीर असल्याचंही म्हटलं. मला भविष्यात होणाऱ्या दुर्घटनाही माहिती आहेत. घटनेला नैतिकतेचा आधार आहे. हे सरकार नैतिकतेच्या पायावर उभा आहे का? हे सरकार घटनेनुसार शपथ घेऊ शकतं का? तसं असेल तर मंत्रिमंडळ विस्तार का होऊ शकला नाही? त्याचं उत्तर महाराष्ट्राला मिळायला हवं. ४० आमदारांपैकी अनेक आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अशा वेळेला शपथ घेतल्यास सरकार कोसळेल, असंही राऊत म्हणाले.

आता गोव्यात 'काय हाटील, काय डोंगर'चं सत्र सुरू! काँग्रेस आमदारांना चेन्नईला हलवलं

खासदारांच्या आग्रहानंतर शिवसेनेनं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता भाजपने उपराष्ट्रपतीपदासाठीचा उमेदवारही जाहीर केला आहे. अशात शिवसेना उपराष्ट्रपतीबाबत काय भूमिका घेणार? असा सवाल त्यांना केला गेला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, की आज संध्याकाळी शरद पवार यांच्याकडे बैठक आहे. त्यानंतर निर्णय घेतला जाईल.

First published:
top videos

    Tags: Eknath Shinde, Sanjay raut