Home /News /maharashtra /

वडिलांच्या एका भेटीसाठी लेक व्याकूळ! पूर्वशी राऊत यांचा ED कार्यालयाबाहेरचा इमोशनल Video समोर

वडिलांच्या एका भेटीसाठी लेक व्याकूळ! पूर्वशी राऊत यांचा ED कार्यालयाबाहेरचा इमोशनल Video समोर

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यानंतर आता त्यांच्या कुटुंबीयांची देखील चौकशी ईडीकडून सुरू आहे.

    मुंबई, 6 ऑगस्ट : पत्राचाळ प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. आज ईडीकडून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची सकाळी साडेदहा वाजल्यापासुन चौकशी सुरू आहे. संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची ईडी कार्यालयात स्वतंत्र्य चौकशी करण्यात येत आहे. ईडी कार्यालयात राऊतांची चौकशी सुरू आहे तर ईडी कार्यालयाच्या बाहेर राऊत कुटुंबीय आहेत. संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनिल राऊत, संदीप उर्फ आप्पा राऊत, संजय राऊत यांची मुलगी पूर्वशी राऊत आणि जावई मल्हार नार्वेकर ईडी कार्यालयाच्या बाहेर सकाळपासून आहेत. यात वडिलांना भेटण्यासाठी मुलगी पूर्वशी राऊत व्याकूळ झालेल्या पाहायला मिळाल्या. काका सुनिल राऊत यांच्यासोबतच पूर्वशी यांचा व्हिडीओ समोर आला आहे. पूर्वशी राऊत यांचे संजय राऊत यांना भेटण्यासाठी प्रयत्न संजय राऊत यांना अटक झाल्यावर आज त्यांच्या पत्नीची चौकशी सुरू आहे. त्यामुळे स्वतःच्या वडिलांना भेटण्याचे प्रयत्न पूर्वशी राऊत करत होत्या. मात्र, ईडी अधिकाऱ्यांकडून या भेटीला परवानगी देण्यात आली नाही. पूर्वशी राऊत यांची सातत्याने समजूत काढण्याचे प्रयत्न काका सुनिल राऊत करत होते. वडिलांच्या भेटीसाठी व्याकूळ झालेल्या पूर्वशी राऊत ईडी कार्यालयाबाहेर फेऱ्या मारताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे काका आमदार सुनील राऊत देखील आहेत. ते त्यांना समजावण्याचा प्रयत्न करताना व्हिडीओत दिसत आहेत. ईडीच्या 2 टीमकडून संजय राऊत आणि वर्षा राऊतांची स्वतंत्र चौकशी वर्षा राऊत यांची चौकशी प्रविण राऊत यांनी वर्षा राऊत यांच्या खात्यात ट्रान्सफर केलेल्या पैशातून अलिबागमध्ये जमीन खरेदीचा व्यवहार झाल्याचा संशय ईडीला आहे. त्यामुळे वर्षा राऊत यांच्या खात्याचे तपशील, जमीन व्यवहार याबाबत आज त्यांची चौकशी सुरू आहे. ..म्हणून कोठडीत मुक्काम वाढला पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय साऊत यांना ईडीने चार 31 ऑगस्ट रोजी अटक केली होती त्यानंतर कोर्टात हजर केले असता 3 दिवसांची कोठडी सुनावली होती. कोठडी संपल्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत यांना विशेष इडी कोर्टात हजर केले. संजय राऊत कोर्टात धनुष्य बाण चिन्ह असलेला भगवा मफलर घालून आले होते तो मफलर त्यांनी काढला जेव्हा त्यांना लक्षात आले की, ते कोर्टात आले. त्यानंतर सुनावणी सुरू झाली. तपासात नवीन आर्थिक व्यवहारांची माहिती समोर आलीये तसंच काही व्यक्तींची आणि संजय राऊत यांची समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. याकरता कोठडीत वाढ करुन देण्यात आली आहे. अलिबाग येथे जमीन घेतली तेव्हा जमीन मालकाला 1.17 कोटी रुपये रोख दिल्याचे ईडीने तपासात उघड झाल्याने सांगितले आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Sanjay raut

    पुढील बातम्या