मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'आमचे हे पुन्हा येतील', क्रांती रेडकरला आनंद गगनात मावेना, मलिकांना सुनावले खडेबोल

'आमचे हे पुन्हा येतील', क्रांती रेडकरला आनंद गगनात मावेना, मलिकांना सुनावले खडेबोल

जात पडताळणी समितीचा अहवाल आल्याने वानखेडे कुटुंबीय आनंदित झाले असून

जात पडताळणी समितीचा अहवाल आल्याने वानखेडे कुटुंबीय आनंदित झाले असून

जात पडताळणी समितीचा अहवाल आल्याने वानखेडे कुटुंबीय आनंदित झाले असून

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 13 ऑगस्ट : बोगस जातीचे प्रमाणपत्र प्रकरणामध्ये एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र जात पडताळणी समितीने वानखेडे हे मुस्लिम नसल्याचे निष्कर्ष काढला आहे. या निर्णयानंतर समीर वानखेडे हे लवकरच महाराष्ट्रामध्ये मोठा जबाबदारीवर परतली, असा विश्वास वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरने व्यक्त केला आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी मुस्लीम धर्म स्विकारला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यामुळे वानखेडे यांनी आधी राष्ट्रीय जातपडताळणी समितीकडे धाव घेतली होती. त्यानंतर आता राज्य जात पडताळणी समितीचा अहवाल समोर आला आहे. यामध्ये वानखेडे यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला नसून ते हिंदु महार असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे वानखेडे कुटुंबाने आता आनंद व्यक्त केला आहे. (अखेर यशसमोर येणार अविनाशचं सत्य; मालिकेत जबरदस्त ट्विस्ट) 'समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीची क्लिन चिट ही आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांना चपराक आहे. समीर लवकरच महाराष्ट्रात, मोठ्या जबाबदारीवर पुन्हा येईल अशी आशा क्रांती रेडकरने व्यक्त केली आहे. दरम्यान, समीर वानखेडे यांचे वाशिम येथील कुटुंबीय नवाब मलिक यांच्या आरोपानंतर व्यथित झाले होते. जात पडताळणी समितीचा अहवाल आल्याने वानखेडे कुटुंबीय आनंदित झाले असून त्यांनी नवाब मलिक यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. नवाब मलिक यांनी काय केला होता आरोप? एनसीबी मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडे हे हिंदू महार नाही तर मुस्लीम असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. समीर वडील ज्ञानदेव का दाऊद ? या उपस्थित केलेला सवाल ? जातीचे खोटे पुरावे देऊन समीर वानखेडे केंद्र सरकारच्या सेवेत दाखल झाल्याचा, आरोप मलिक यांनी केला होता. (कामाख्या देवीचे दर्शन घेऊन शिंदेंनी पाडलं होतं सरकार, आता खैरेंनी केलं यज्ञ) समीर दाऊद वानखेडे का समीर ज्ञानदेव वानखेडे ? ज्ञानदेव वानखेडे हे दाऊद वानखेडे कसे ? आज सरकारी रेकॉर्डवर, समीर हिंदू महारजन्म झाला. वडील हिंदू का मुसलमान ? समीर यांचा जन्म झाला तेव्हाच्या कागदावर समीर मुसलमान नंतर सरकारी नोकरी कागदावर समीर नवबौद्ध असल्याचा उल्लेख होता. मलिक यांनी याबद्दल वानखेडे यांच्या वडिलांचे कागदपत्र सुद्धा दाखवली होती. परंतु, 2008 लाही याच कार्यालयानं, समीर हिंदू महार असल्याचा हाच दाखला पुन्हा दिला. कुटुंबांचा हिंदू महार असल्याच्या इतिहासावर आधारीत ठरत असतं हे जात प्रमाणपत्र. मात्र या कागदांचा खरा आधार असतो, तो म्हणजे जन्म पुरावा. याचमुळं बीएमसी अर्थात मुंबई महापालिकेचं रेकॉर्ड काय म्हणतंय ? हा प्रश्न उपस्थित झाला. थेट बीएमसी गाठण्याचा निर्णय घेतला आणि या जागी बीएमसीच्या सावळा गोंधळाचा असाही एक पुरावा हाती लागला.
First published:

पुढील बातम्या