मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

समीर वानखेडे मुस्लिम नाही, जात पडताळणी समितीकडून क्लीन चिट, मलिकांना धक्का

समीर वानखेडे मुस्लिम नाही, जात पडताळणी समितीकडून क्लीन चिट, मलिकांना धक्का

समीर वानखेडे यांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचा पुरावा नाही. जात पडताळणी समितीचा अहवाल

समीर वानखेडे यांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचा पुरावा नाही. जात पडताळणी समितीचा अहवाल

समीर वानखेडे यांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचा पुरावा नाही. जात पडताळणी समितीचा अहवाल

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 13 ऑगस्ट : मुंबईतील क्रुझ ड्रग्स प्रकरणामुळे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला होता. वानखेडे हे मुस्लीम असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. पण, आता समीर वानखेडे यांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचा पुरावा नाही, असा अहवाल जात पडताळणी समितीने दिला आहे. त्यामुळे वानखेडेंनी मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी मुस्लीम धर्म स्विकारला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यामुळे वानखेडे यांनी आधी राष्ट्रीय जातपडताळणी समितीकडे धाव घेतली होती. त्यानंतर आता राज्य जात पडताळणी समितीचा अहवाल समोर आला आहे. यामध्ये वानखेडे यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला नसून ते हिंदु महार असल्याचा खुलासा केला आहे. नवाब मलिक यांनी काय केला होता आरोप? एनसीबी संचालक समीर वानखेडे हे हिंदू महार नाही तर मुस्लीम असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. समीर वडील ज्ञानदेव का दाऊद ? या उपस्थित केलेला सवाल ? जातीचे खोटे पुरावे देऊन समीर वानखेडे केंद्र सरकारच्या सेवेत दाखल झाल्याचा, आरोप मलिक यांनी केला होता. (इथे भाड्याने पोलीस मिळतील; इतक्या हजारात संपूर्ण पोलीस ठाणं करता येतं बुक) समीर दाऊद वानखेडे का समीर ज्ञानदेव वानखेडे ? ज्ञानदेव वानखेडे हे दाऊद वानखेडे कसे ? आज सरकारी रेकॉर्डवर, समीर हिंदू महारजन्म झाला. वडील हिंदू का मुसलमान ? समीर यांचा जन्म झाला तेव्हाच्या कागदावर समीर मुसलमान नंतर सरकारी नोकरी कागदावर समीर नवबौद्ध असल्याचा उल्लेख होता. मलिक यांनी याबद्दल वानखेडे यांच्या वडिलांचे कागदपत्र सुद्धा दाखवली होती.
First published:

पुढील बातम्या