मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : न्यू नागपाडा वार्डात मागच्या वेळी सपाची बाजी; यावेळी निकाल काय लागणार?

BMC Election 2022 : न्यू नागपाडा वार्डात मागच्या वेळी सपाची बाजी; यावेळी निकाल काय लागणार?

2017च्या निवडणुकीत हा वार्ड ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित होता. मात्र, यावेळी हा वार्ड क्रमांक 211 न्यू नागपाडा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे.

2017च्या निवडणुकीत हा वार्ड ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित होता. मात्र, यावेळी हा वार्ड क्रमांक 211 न्यू नागपाडा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे.

2017च्या निवडणुकीत हा वार्ड ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित होता. मात्र, यावेळी हा वार्ड क्रमांक 211 न्यू नागपाडा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 7 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. न्यू नागपाडा वार्ड क्रमांक 211चा (Ward no. 211 BMC) विचार केला तर या ठिकाणी 2017मध्ये समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) रईस कासम शेख यांनी निवडणूक जिंकली होती. मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय विशेष आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 211 बद्दल. 2017च्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 211 ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित होता. त्यात समाजवादी पक्षाचे रईस कासम शेख हे निवडून आले होते. त्यांना 9455 इतकी मते मिळाली होती. मात्र, तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस पक्ष होता. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेले मतदान -
  1. रईस कासम शेख, सपा - 9455
  2. अन्सारी मसीराह एजाज अहमद, काँग्रेस - 7081
  3. आदिलमोबिन कुरेशी, एआयएमआयएम - 3420
  4. रोहिदास मधुकर लोखंडे, भाजप 761
  5. रोहित श्रीधर राहटे, शिवसेना - 714
  6. अन्सारी अयाज, अपक्ष - 124
2017च्या निवडणुकीत हा वार्ड ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित होता. मात्र, यावेळी हा वार्ड क्रमांक 211 न्यू नागपाडा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे यावेळी इथे नवे चेहरे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. यावेळी वार्ड क्रमांक 211 मधील जनता पुन्हा समाजवादी पक्षाला संधी देते की अन्य दुसऱ्या पक्षाला हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या