मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /BREAKING : रश्मी शुक्लांचा आणखी प्रताप उघड, राऊत-खडसेंचा 60 दिवस केला फोन टॅप!

BREAKING : रश्मी शुक्लांचा आणखी प्रताप उघड, राऊत-खडसेंचा 60 दिवस केला फोन टॅप!

 कुलाबा पोलीस स्टेशन पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे.

कुलाबा पोलीस स्टेशन पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे.

कुलाबा पोलीस स्टेशन पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे.

मुंबई, 11 एप्रिल : फोन टॅपिंग प्रकरणात (Phone tapping case)  पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा तब्बल 60 दिवस फोन टॅप करण्यात आला होता तर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा 67 दिवस फोन टॅप करण्यात आला होता,  अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.

नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरण IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांची पोलिसांनी चौकशी केली आहे. या चौकशीनंतर आता नवीन माहिती समोर आली आहे.  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा तब्बल ६० दिवस फोन टॅप करण्यात आला होता.  तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा ६७ दिवस फोन टॅपिंग करण्यात आला होता. कुलाबा पोलीस स्टेशन पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

नाना पटोले, बच्चू कडूंचा सुद्धा झाला फोन टॅप

याआधाही  राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी पहिल्यांदाच कुणा-कुणाचे फोन टॅप झाले होते, याची माहिती जाहीर केली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा अमजद खान नावाने फोन टॅप करण्यात आल्याचे वळसेंनी सांगितलं होते.

(दारुच्या नशेत 2 तरुण अडकले लग्नाच्या बेडीत; नंतर घडलेला फिल्मी ड्रामा एकदा वाचाच)

'रश्मी शुक्ला पुण्याच्या आयुक्त असताना काही राजकीय लोकांचे फोन टॅप केले होते. रश्मी शुक्ला यांनी योग्य ती प्रक्रिया न फॉलो करता फोन टॅपिंग केलं होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे यांचे फोन टॅप करण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती पाटील यांनी दिली.

(इम्रान खान यांची 'कॅप्टनसी' जातच PCB मध्ये बदलाचे वारे, अध्यक्ष देणार राजीनामा!)

'फोन टॅप करत असताना प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी नाव दिली गेली होती. नाना पटोले यांचा फोन नंबर हा अमजद खान. बच्चू कडू यांचा फोन नंबर निजामुद्दीन बाबु शेख, तर संजय काकडे यांचे दोन नंबर एक तर परवेज सुतार आणि दुसरा अभिजीत नायर आणि आशिष देशमुख यांचंही तसंच त्यांचेही दोन नंबर एक तर रघू सोरगे आणि दुसरा महेश साळुंखे या नावाने दाखवून त्यांचे कॉल रेकॉर्ड टॅप करण्यात आले होते. म्हणजे राजकारण्यांचे नंबर अशा काही लोकांच्या नावाने सांगण्यात आले त्यांचं अस्तित्व कदाचित काहीच नाही पण आता यांचा फोन करायचा आहे आणि जर खरं नाव सांगितलं तर कसं शक्य होईल म्हणून या तोतया नावाने रश्मी शुक्ला यांनी भाजपच्या सरकारच्या काळात हे फोन टॅप केले होते, असंही पाटील यांनी सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Eknath khadse, Sanjay raut