मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'तुमचा हेतू न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही, इतकंच सांगतो की..', राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा

'तुमचा हेतू न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही, इतकंच सांगतो की..', राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा

राज ठाकरे म्हणाले 'उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही.'

    मुंबई 30 जुलै : मुंबईबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्त्व्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. तर, भाजपच्या नेत्यांनी मात्र त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे. अशात आता राज ठाकरे यांनी कोश्यारी यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्याच कष्टाचं योगदान'; टीकेची झोड उठताच राज्यपालांची सारवासारव राज ठाकरे यांनी म्हटलं, 'आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे, म्हणून आपल्याविरोधात बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रातील मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक इथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? ' असा सवाल राज ठाकरेंनी पोस्टमध्ये केला. पुढे ते म्हणाले की 'उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो'. 'राज्यपालांनी नाही त्या विषयात नाक खुपसण्याची गरज नाही', मनसे नेते संदीप देशपांडेंनी सुनावलं काय म्हणाले राज्यपाल? 'मी अनेक जणांना सांगत असतो, महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती लोकांना काढून टाका किंवा राजस्थानी लोकांनाही काढू टाका, जर गुजराती आणि राजस्थानी लोक सोडून गेले तर तुमच्याकडे कोणतेच पैसे उरणार नाही. मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही, असं विधानच राज्यपालांनी केलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Governor bhagat singh, Raj Thackeray

    पुढील बातम्या