मुंबई, 25 मार्च : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि आमदारांवर ईडीच्या कारवाईचे सत्र सुरूच आहे. आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (pratap sarnik) यांची NSEL घोटाळा प्रकरणात (NSEL fraud case) 11.35 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीला आपण पूर्ण सहकार्य केले आहे, माझ्याकडे 30 दिवसांची मुदत असून न्यायालयात दाद मागणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. आज ईडीने ठाण्यातील फ्लॅट आणि मीरा रोडमधील भुखंड जप्त केला आहे. अधिवशेनात पत्रकारांशी बोलत असताना प्रताप सरनाईक यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
'ईडीकडून मला आठवड्याभरापूर्वीच नोटीस पाठवण्यात आली होती. तीस दिवसांच्या आतमध्ये मी अपील करणार आहे. न्यायालयाने जो निर्णय देईल तो मला मान्य राहणार आहे, असं प्रताप सरनाईक म्हणाले.
(Multibagger stock: 27 रुपयांचा शेअर 2420 रुपयांवर, गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई)
'२४ नोव्हेंबर २०२१ मध्ये ईडीने कारवाई केली होती. सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्यामुळे कारवाई केली. न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. सेनेचा प्रवक्ता असल्यामुळे कंगना राणावत आणि अर्नब गोस्वामी यांच्यावर हक्कभंग आणला होता. त्यानंतर माझ्यावर कारवाई केली गेली, असंही सरनाईक यांनी सांगितलं.
'NSEL चा पूर्ण अर्थ काय आहे, हे सुद्धा मी तपासत आहे. ईडीने जे समन्स बजावले आहे त्यांची प्रत्येक उत्तरं दिली आहे. भविष्यात जी ईडीला सामोरं जाईल. न्यायालयीन प्रक्रिया आहे. मागील आठवड्यातच मला ईडीची नोटीस मिळाली होती. येताना काही टीव्हीवर NSEL मध्ये माझा घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. माझे २ फ्लॅट आणि मीरा रोडमध्ये ५० मिटरची जमीन ईडीने जप्त केली आहे. आता याबद्दल न्यायालयामध्ये दाद मागणार आहे, असंही सरनाईक म्हणाले.
(Shocking! भूकेल्या मगरींना हाताने घास भरवायला गेला; पुढे काय घडलं पाहा, VIDEO)
'मी काही अचानक राजकारणामध्ये आलो नाही. माझ्यावर ईडीने कारवाई केली होती, त्यावेळी मी ईडीला सामोरं गेलो. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वादात अशा कारवाया होणारच आहे, असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमच्या परिवाराचे प्रमुख आहे. नेहमी ते मार्गदर्शन करत असतात. मागेही त्यांच्या कानी घातले होते. आताही त्यांच्याशी बोलणार आहे. सरनाईक कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद कायम असतो. त्यांच्याही कानी टाकणार आहे, असंही सरनाईकांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.