मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिंदे गटातील शपथ घेतलेल्या 'या' तीन मंत्र्यांना भाजपचा होता विरोध; काय आहे कारण...

शिंदे गटातील शपथ घेतलेल्या 'या' तीन मंत्र्यांना भाजपचा होता विरोध; काय आहे कारण...

Cabint Expansion : संजय राठोड, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार या तीन मंत्र्यांना भाजपकडून विरोध होता अशी माहिती समोर येत आहे.

Cabint Expansion : संजय राठोड, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार या तीन मंत्र्यांना भाजपकडून विरोध होता अशी माहिती समोर येत आहे.

Cabint Expansion : संजय राठोड, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार या तीन मंत्र्यांना भाजपकडून विरोध होता अशी माहिती समोर येत आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 10 ऑगस्ट : राज्यातील शिंदे-भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. मात्र शिंदे गटातील तीन मंत्र्यांना भाजपकडून विरोध असल्याची माहिती आता समोर येत आहे. मात्र भाजपकडून होत असलेल्या विरोधानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तीन मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. संजय राठोड, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार अशी या तीन मंत्र्यांची नावं आहे. एबीपी माझाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. भाजपकडून या तीन मंत्र्यांना नेमका विरोध का होता? दीपक केसरकर : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यासोबत असलेला वाद हे या विरोधाचं एक कारण होतं. कारण शिंदे गट भाजपसोबत असला तरी केसरकर यांनी राणे यांच्याबाबतची आपली विरोधाची भूमिका बदलली नव्हती. दुसरं म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराआधी केसरकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी केलेली वक्तव्ये शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील दुरावा कमी करणारी होती. यामुळे भाजपचा त्यांना विरोध होता. Chitra Wagh vs Shiv Sena : चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या वाघाला डिवचले म्हणाल्या नितीश कुमार आणि उद्धव एकच मार्ग अब्दुल सत्तार : टीईटी घोटाळ्यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावं आल्याने भाजपचा विरोध होता. तसेच अब्दुल सत्तार यांना मंत्री केल्याने हिंदुत्ववादी सरकारनेमध्ये मुस्लीम मंत्री कसा असा प्रश्न निर्माण होईल, असं भाजपला वाटत होतं. तसेच अब्दुल सत्तार यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता त्यात त्यांनी एका व्यक्तीला देवाच्या नावावरुन शिव्या दिल्या होत्या. त्यावेळी हिंद्त्ववादी संघटनांनी त्यांच्याविरोधात आंदोलनं देखील केली होती. राऊतांना जेलमध्ये भेटायला गेले खासदार आणि आमदार, प्रशासनाने परत पाठवले संजय राठोड : एका तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी भाजपने संजय राठोड यांच्याविरोधात मोठं आंदोलन उभारलं होतं. यामुळेच मागच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झालानंतर त्यांच्यासोबतच काम करावं लागेल. त्यामुळे आपल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल, अशी भीती भाजपला होती. म्हणून संजय राठोड यांच्या नावाला भाजपचा विरोध होता.
First published:

Tags: BJP, Eknath Shinde, Shiv Sena (Political Party)

पुढील बातम्या