मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दारूची बाटली दाखवित दारूड्यालाच उतरवलं बाटलीत; पोलिसांचा जीव पडला भांड्यात..

दारूची बाटली दाखवित दारूड्यालाच उतरवलं बाटलीत; पोलिसांचा जीव पडला भांड्यात..

विद्युत टॉवरवर चढलेल्याला खाली उतरण्यासाठी पोलिसांनी असं काही केलं की,....

विद्युत टॉवरवर चढलेल्याला खाली उतरण्यासाठी पोलिसांनी असं काही केलं की,....

विद्युत टॉवरवर चढलेल्याला खाली उतरण्यासाठी पोलिसांनी असं काही केलं की,....

उल्हासनगर, 22 एप्रिल : आत्महत्या करण्यासाठी तो चक्क १०० फुटांपेक्षा जास्त उंचीच्या टाटा विद्युत टॉवरच्या शेवटच्या टोकावर पोहचला होता. इथल्या येणाऱ्या जाणाऱ्याची नजर त्याच्यावर पडली. त्यानंतर पोलीस, अग्निशमन दल आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं. मात्र तो काही केल्या खाली उतरत नव्हता. अखेर त्याला दारूचं आणि पाण्याचा आम्ही दाखवत कसं बसं खाली उतरून त्याचा जीव वाचवला. हा सगळा शोले स्टाईल ड्रामा उल्हासनगरजवळील (Ulhasnagar News) सी ब्लॉक शहाड फाटक परिसरात घडला. हा ड्रामा बघण्यासाठी शेकडोची गर्दी इथे जमली होती.

भगवान भोईटे असे टॉवरवर चढलेल्या व्यक्तीचे नाव आहे. भगवान पत्नीसह जालन्याहून उल्हासनगर आला आहे. भगवान दुपारच्या सुमारास जीव देण्यासाठी विद्युत टॉवरवर चढला. काही नागरिकांनी त्याला पाहिले. यानंतर भगवानला खाली उतरण्यासाठी पोलीस प्रशासन अग्निशमन दल आणि महावितरणला मोठे कष्ट घ्यावे लागले. भगवानचे मानसिक संतुलन काही दिवसांपासून बिघडलेला आहे आणि त्यामुळे तो आत्महत्या करण्यासाठी या टॉवरवर चढला होता अशी माहिती सध्या मिळते आहे. त्याला खाली उतरण्यासाठी पोलीस प्रशासन, अग्निशमन दलाच्या जवानांना खूप विनवण्या कराव्या लागल्या.

हे ही वाचा-Maharashtra Load Shedding : महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी! राज्यावर वीजसंकट, लोडशेडिंग सुरु होणार

मात्र तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला वाचवण्यासाठी अग्निशमन दल आल्याचे पाहताच भगवान टॉवरच्या शेवटच्या टोकावर जाऊन पोहचला. अखेर जमलेल्या गर्दी पैंकी काहींनी त्याला दारूची बाटली तर काहींनी पाण्याची बाटली दाखवली. मग पठयाने खाली उतरायला सुरुवात केली. तब्बल दीड ते दोन तासानंतर हा सगळा ड्रमा सुरू होता. तो थोडा खाली आल्यानंतर उल्हासनगर पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे अमित शिंदे यांनी त्याचा पाय धरत त्याला पकडून ठेवले आणि अग्निशमन दलाच्या मदतीने सुखरूपपणे पोलिसांच्या स्वाधीन केले.

या सगळ्या ड्राम्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा काही काळ बंद ठेवण्यात आला होता. आता या भगवानला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. भगवान हा जालन्यातील भिकारी असून त्याची आणि त्याच्या पत्नीची व्यवस्था निवारा शेडमध्ये पोलिसांनी केली आहे. आम्हांला दुपारी एक व्यक्ती टॉवरवर चढल्याची माहिती मिळाली. त्यानंतर जाऊन मोठ्या मेहनतीने पोलिसांचा सहकार्याने त्याचे जीव वाचवल्याचे उल्हासनगर अग्निशमन दलाचे अधिकारी बाळू नेटके यांनी सांगितले.

First published:

Tags: Crime, Ulhasnagar