मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /50-50 बिस्कीट दाखवून विरोधकांची घोषणाबाजी, अजितदादाही पुडा पाहतच राहिले...

50-50 बिस्कीट दाखवून विरोधकांची घोषणाबाजी, अजितदादाही पुडा पाहतच राहिले...

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी विधानभवनांच्या पायऱ्यांवर एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी विधानभवनांच्या पायऱ्यांवर एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी विधानभवनांच्या पायऱ्यांवर एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 ऑगस्ट :  पावसाळी अधिवेशनामध्ये (Maharashtra Assembly Monsoon Session 2022) विरोधकांनी तुफान घोषणाबाजी करून सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार निदर्शनं केली आहे. आज सुद्धा विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकत्र येऊन चक्क 50-50 बिस्कीटाचे पुडे दाखवून 50 50 चला गुवाहाटी अशा घोषणा दिल्यात. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार  सुद्धा विरोधकांमध्ये सामील झाले होते.

पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांच्या घोषणा आजही लक्षवेधी ठरल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी विधानभवनांच्या पायऱ्यांवर एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. 50-50 बिस्कीटचे पुडे घेऊन विरोधकांनी घोषणाबाजी केली. अजित पवार, आदित्य ठाकरे यांच्यासह सर्व आमदारांनी बिस्कीटचे पुडे दाखवून 50-50 चलो गुवाहाटी अशा घोषणा दिल्या.  यावेळी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले समोरून येत होते. यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी 'आले आले रे गद्दार आले' अशा घोषणा दिल्या.

(शिवसेना Vs शिंदे गटात राडा सुरूच, आता उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची शिवसेनेतून हकालपट्टी)

याआधीही पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस विरोधकांनी घोषणाबाजीने गाजवला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी एकत्र येतत जोरदार घोषणाबाजी केली. 50 खोके...एकदम ओक्के, ईडी सरकार हाय हाय अशी घोषणा देणे सुरू केले. जेव्हा शिंदे गटाचे आमदार विधानभवनात जात होते, त्यावेळी विरोधकांच्या घोषणाबाजीला आणखी जोर वाढला. मुख्यमंत्री शिंदे जात असताना सुद्धा विरोधकांनी घोषणाबाजी केली होती.

शिवसेनेच्या बंडखोर आमदार यामिनी जाधव जाताना विरोधकांनी 50 खोके एकदम..ओक्के...ईडी ईडी अशा घोषणा दिल्या. या घोषणाबाजीमुळे यामिनी जाधव काही न बोलता पुढे निघून गेल्या. त्यानंतर ईडीच्या कारवाईमुळे बेजार झालेले आमदार प्रताप सरनाईक आले. त्यावेळी आले आले गद्दार आले, 'गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुहावाटी' अशा घोषणा देऊन एकच हल्लाबोल केला. त्यामुळे सरनाईक यांनाही उलट घोषणा देऊन विधानभवनात जाणे पसंत केले.

First published:

Tags: Lokmat news, Lokmat news 18, Marathi news, अधिवेशन, पावसाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन महाराष्ट्र, विधीमंडळ पावसाळी अधिवेशन २०२२