मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बेल्टमध्ये लपवून सुरू होती सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावर 12 किलो गोल्ड जप्त

बेल्टमध्ये लपवून सुरू होती सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावर 12 किलो गोल्ड जप्त

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका विशेष बेल्टच्या आतमध्ये लपवून हे सोनं विदेशात घेऊन जाण्यात येत होतं. (12 Kg Gold Seized on Mumbai Airport)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 11 सप्टेंबर : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई सीमाशुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावरुन तब्बल 12 किलो सोनं जप्त केलं आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत जवळपास 6 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. हे सोनं विदेशात घेऊन जाण्यात येत होतं.

VIDEO: दिल्लीत भीक मागण्यासाठी मुंबईतून बाळांची चोरी; CCTV फुटेजमुळे भांडाफोड, महिलेला अटक

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका विशेष बेल्टची आतमध्ये लपवून हे सोनं विदेशात घेऊन जाण्यात येत होतं. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सूदान येथून आलेल्या 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबईत विमानतळावर सध्या याबाबत चौकशी केली जात आहे.

बेल्टमध्ये लपवून सोन्याची तस्करी

बेल्टमध्ये लपवून सोन्याची तस्करी

मुंबईत हे सोन्याचे तस्कर कोणाच्या संपर्कात होते, या बाबतची चौकशी केली जात आहे. सुदानमधून सोन्याची तस्करी कधी आणि कशी होते, याबाबतचा संपूर्ण तपास सीमाशुल्क विभाग करत आहे.

धक्कादायक! मुख्याध्यापकानं एवढं मारलं की विद्यार्थ्याचा फ्रॅक्चर झाला पाय

याआधी आठवडाभरापूर्वीच मुंबई विमानतळावरुन सोनं तस्करीची आणखी एक घटना समोर आली होती. यात मस्कतहून विमानानं आलेल्या एका प्रवाशानं कंबरेच्या पट्ट्यात दीड कोटींचं अडीच किलो सोनं लपवून आणलं होतं. मात्र, विमानतळावर पकडलं जाण्याच्या भीतीनं आरोपीनं शौचालयातील डस्टबिनमध्ये सोनं फेकलं. यानंतर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. यानंतर आता पुन्हा एकदा सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर मोठी कारवाई करत 6 कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे .

First published:

Tags: Gold, Mumbai News