मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नवाब मलिक यांना आजही दिलासा नाहीच! ईडीचा कोर्टात जोरदार युक्तीवाद, पुढील सुनावणी 6 सप्टेंबरला

नवाब मलिक यांना आजही दिलासा नाहीच! ईडीचा कोर्टात जोरदार युक्तीवाद, पुढील सुनावणी 6 सप्टेंबरला

Nawab Malik Bail Application : राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी झाली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 29 ऑगस्ट : गोवावाला कंपाउंड आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. यावर आज सोमवारी 28 ऑगस्ट रोजी कोर्टात सुनावणी झाली. नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात ईडीकडून युक्तिवाद करण्यात आला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावानं धमकी देऊन कुर्ल्यातील जमीन बळकावली होती, असा युक्तीवाद ईडीने कोर्टात केला. मलिक यांच्या याचिकेवर आता पुढील सुनावणी 6 सप्टेंबरला होणार आहे.

काय होता ईडीचा युक्तीवाद

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावानं धमकी देऊन कुर्ल्यातील जमीन बळकावली होती. हसीना पारकर यांनी दाऊच्या नावावर कुर्ल्यासह मुंबईत अनेक प्रॉपर्टी बळकावल्या आहेत. त्यातील कुर्ला येथील जमीन नवाब मलिक यांनी विकत घेतली होती. या जमिनीच्या खरेदी विक्रीत, आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. नवाब मलिक यांच्या प्रकरणाशी संबंधित साक्षीदारांच्या जबाबाचा अहवाल, युक्तीवादादरम्यान अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी कोर्टात सादर केला. त्यामुळे नवाब मलिक यांना जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तीवाद ईडीने केला आहे. आता मलिक यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी 6 सप्टेंबरला

या सुनावणीदरम्यान, नवाब मलिकांना जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तीवाद ईडीच्यावतीने अतिरीक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी केला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमची बहिण हसीना पारकरने कुर्ला येथील गोवावाला कंपाउंडची जमीन बळकावली असा आरोप त्यांच्यावर आहे. नंतर नवाब मलिकांनी ती जमीन खरेदी केली असा आरोप मलिक यांच्यावर आहे. याच आरोपांखाली मलिक यांना ईडीने अटक केलेली आहे.

काय आहेत आरोप?

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमची बहिण हसीना पारकरने कुर्ला येथील गोवावाला कंपाउंडची जमीन बळकावली असा आरोप त्यांच्यावर आहे. नंतर नवाब मलिकांनी ती जमीन खरेदी केली असा आरोप मलिक यांच्यावर आहे. याच आरोपांखाली मलिक यांना ईडीने अटक केलेली आहे.

First published:

Tags: ED, Nawab malik