मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

काही नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं; मंत्रिमंडळ विस्तारावर अजित पवारांची प्रतिक्रिया

काही नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं; मंत्रिमंडळ विस्तारावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Maharashtra Cabinet Expansion :  राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. काही नावं टाळता आली असती अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी एबीपी माझाला दिली आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 9 ऑगस्ट : राज्यातील शिंदे-भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज सव्वा महिन्यानंतर आज पार पडला. एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यातील काही नावांबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याबाबत समिश्र प्रतिक्रिया येत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. काही नावं टाळता आली असती अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी एबीपी माझाला दिली आहे. उशीरा का होईना एकदाचा शपथविधी झाला. महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळालं आता लवकरात लवकर राज्यातील प्रश्न सोडवावेत. खुप समस्या आहेत ते सोडवावेत. मात्र ज्यांच्याबद्दल अद्याप बोललं जात आहे, ज्यांना अद्याप क्लीनचिट मिळालेली नाही, अशांना मंत्रिमंडळात घेतलं, मात्र ते टाळता आलं असतं तर बरं झालं असतं, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. 'स्वच्छ' प्रतिमेचं काय? अब्दुल सत्तारांपासून संजय राठोडांपर्यंत वादात अडकलेल्या या आमदारांनीही घेतली शपथ, केसेस मागे? टीईटी घोटाळा प्रकरणातील यादीत अब्दुल सत्तार यांच्या मुली आणि मुलांचही नाव होतं. टीईटी घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून वगळ्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सत्तार यांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. चित्रा वाघ आक्रमक पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे संजय राठोड यांना आपल्या वनमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. पण, आज शिंदे गटाकडून पुन्हा एकदा संजय राठोड यांना मंत्रिपद बहाल करण्यात आले आहे. संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आल्यामुळे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे", अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली. Nashik Dadaji Bhuse : शेतकरी ते कॅबीनेटमंत्री दादाजी भुसेंना एकनाथ शिंदेंकडून मैत्री गिफ्ट मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नव्या चेहऱ्यांना आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना संधी दिली जाईल, असं  बोललं जात होतं. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारावेळी काही केसेस दाखल असलेल्या आमदारांनीही शपथ घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या आमदारांवरून केस बंद केल्या गेल्या का? असा सवाल उपस्थित होत आहे.
First published:

Tags: Ajit pawar, Eknath Shinde

पुढील बातम्या