मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : टॅक्सीमन कॉलनी, महाराष्ट्र नगर वार्डातील परिस्थिती काय; राष्ट्रवादीला पुन्हा संधी मिळणार का?

BMC Election 2022 : टॅक्सीमन कॉलनी, महाराष्ट्र नगर वार्डातील परिस्थिती काय; राष्ट्रवादीला पुन्हा संधी मिळणार का?

वार्ड क्रमांक 168मध्ये चुनाभट्टी स्टेशन(पश्चिम), कुर्ला स्टेशन (पश्चिम), कल्पना नगर, टॅक्सीमन कॉलनी, महाराष्ट्र नगर, कुर्ला मेट्रोपॉलिटन कोर्ट, भाभा हॉस्पिटल, कुर्ला (पश्चिम) बेस्ट डेपो हे भागांचा समावेश होतो.

वार्ड क्रमांक 168मध्ये चुनाभट्टी स्टेशन(पश्चिम), कुर्ला स्टेशन (पश्चिम), कल्पना नगर, टॅक्सीमन कॉलनी, महाराष्ट्र नगर, कुर्ला मेट्रोपॉलिटन कोर्ट, भाभा हॉस्पिटल, कुर्ला (पश्चिम) बेस्ट डेपो हे भागांचा समावेश होतो.

वार्ड क्रमांक 168मध्ये चुनाभट्टी स्टेशन(पश्चिम), कुर्ला स्टेशन (पश्चिम), कल्पना नगर, टॅक्सीमन कॉलनी, महाराष्ट्र नगर, कुर्ला मेट्रोपॉलिटन कोर्ट, भाभा हॉस्पिटल, कुर्ला (पश्चिम) बेस्ट डेपो हे भागांचा समावेश होतो.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 10 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 168 बाबत (Ward no. 168 BMC) विचार केला तर याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) बाजी मारली होती. राष्ट्रवादीच्या सईदा खान या वार्डात विजयी झाल्या होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घातला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 168 बाबत. वार्ड क्रमांक 168मध्ये चुनाभट्टी स्टेशन(पश्चिम), कुर्ला स्टेशन (पश्चिम), कल्पना नगर, टॅक्सीमन कॉलनी, महाराष्ट्र नगर, कुर्ला मेट्रोपॉलिटन कोर्ट, भाभा हॉस्पिटल, कुर्ला (पश्चिम) बेस्ट डेपो हे भागांचा समावेश होतो. वार्ड क्रमांक 168मध्ये 2017च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विजयी झाला होता. राष्ट्रवादीच्या उमेदवार सईदा खान याठिकाणी विजयी झाल्या होत्या. त्यांना या निवडणुकीत 7896 इतकी मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या प्रमुख पक्षांमध्ये लढत झाल्याचे पाहायला मिळाले होते. 2017 च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते - डॉ. सईदा खान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - 7896 डॉ. सौ. अनुराधा महेश पेडणेकर, शिवसेना - 6313 मदने दिपिका प्रेमचंद, भाजप - 5645 कलानिमय नूरजहाँ अब्दुलमजीद, एमआयएम - 2723 आसमा मोहम्मद मुदस्सर शेख, समाजवादी पार्टी - 1150 खान सोफिया अब्दुल हन्नान, काँग्रेस - 866 खान नूर सबा इमरान, बहुजन समाज पार्टी- 256 घाडगे मिनाक्षी प्रशांत, मनसे - 221 खान शकीरा शफीक अहमद, अपक्ष - 45 काझी शाकीरा खातून अजीजउल्लाह, भारतीय मायनॉरीटी सुरक्षा महासंघ - 51 त्यावेळी 25,362 इतकी मते वैध ठरली होती. 2011मधील जनगणनेनुसार, वॉर्ड क्रमांक 168 मधील एकूण लोकसंख्या 50941 इतकी होती. यापैकी अनुसूचित जाती 4528 आणि अनुसूचित जमातीचे 165 नागरिक आहेत. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यातील सत्तांतराचा परिणाम होणार का? नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वार्ड क्रमांक 168 यामध्ये सर्वसाधारण गटातून महिला उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक पक्षांच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीसाठी उत्साह आहे. मतदार कोणत्या पक्षाला संधी देतात आणि या निवडणुकीत राज्यातील सत्तांतराचा परिणाम दिसणार का?, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या